Advertisement

मुंबईकरांनो सावधान! मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा ५००च्या पार

मुंबईत कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढलेली पाहायला मिळत आहे.

मुंबईकरांनो सावधान! मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा ५००च्या पार
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढलेली पाहायला मिळत आहे. पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी मुंबईत 506 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मंगळवारी १७ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मंगळवारी 218 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईमध्ये सध्या 2526 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,43,710 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 2355 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.029% टक्के इतका आहे.

राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 2526 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 297 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 413 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगर 17, रायगड 83, पालघर 29, रत्नागिरी 15 आणि नागपूरमध्ये 21 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 3475 सक्रिय रुग्ण आहेत.

मंगळवारी राज्यात 711 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये एकूण 366 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 338 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, कोविड-19 प्रकरणे वाढत राहिल्यास, सरकारला निर्बंधांबाबत पुन्हा विचार करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. कोरोनाव्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत राहिली तर महाराष्ट्र सरकारला काही मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यावर लक्ष ठेवावे लागेल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळाशी पुरेसा सल्लामसलत केल्यानंतरच मार्गदर्शक तत्त्वांमध्ये किंवा नवीन निर्बंधांमध्ये कोणताही बदल करण्याचा विचार केला जाईल, असेही पवार म्हणाले.

दुसरीकडे, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात पत्रकारांशी संवाद साधताना बीजिंग आणि शांघायसारख्या आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये नवीन निर्बंध लागू करण्यात आल्याचे स्पष्ट केले. तेथे, प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर लोकांना घरीच राहण्याचा इशारा देण्यात आला आहे, असे टोपे म्हणाले.



हेही वाचा

अल्टिमेटम संपला, आता दुकानांवर मराठीत पाट्या लावल्या नसतील तर...

मे महिन्यात कोविड रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच्या प्रमाणात २३१% वाढ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा