Advertisement

कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण मुंबईत सापडले

होम आयसोलेशनमध्ये 23 रुग्ण असून एक रुग्ण रुग्णालयात आयसोलेशनमध्ये आहे.

कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण मुंबईत सापडले
SHARES

मंगळवारी म्हणजेच 19 डिसेंबर रोजी कोरोनाची 11 प्रकरणं समोर आल्याने चिंता वाढली आहे. सर्वाधिक रूग्ण हे राजधानी मुंबईत आहेत. या नव्या रूग्णांमुळे आतापर्यंत कोरोनाचे एकूण 35 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 35 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 27 फक्त मुंबईत सापडलेत.

आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटीननुसार, मुंबईमध्ये 27, पुण्यात 2 आणि कोल्हापुरात एक रुग्ण एक्टिव्ह आहे.

होम आयसोलेशनमध्ये 23 रुग्ण असून एक रुग्ण रुग्णालयात आयसोलेशनमध्ये आहे. या रूग्णाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलंय.

भारतात कोविड-19 चे सब-व्हेरियंट JN.1 चे पहिलं प्रकरण 8 डिसेंबर रोजी केरळमध्ये नोंदवण्यात आलं होतं. कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट सापडल्यानंतर केंद्र सरकार अलर्ट मोडमध्ये होतं.

देशात कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होत असताना आणि JN.1 प्रकारातील पहिलं प्रकरण समोर आल्याने केंद्राने सोमवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतत पाळत ठेवण्यास सांगितलं.

केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे की, "केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील सातत्यपूर्ण आणि कामामुळे आम्ही कोरोना-19 प्रकरणांची आकडेवारी कमी करू शकलो.



हेही वाचा

मुंबईत 'नव्या' गालगुंडची साथ, बहिरी होण्याचाही धोका

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा