Advertisement

मुंबईत कोरोना रुग्णाच्या दुपटीचा कालावधी २५० दिवसांवर

मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी २५० दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. मुंबईत आॅक्टोबरपासून कोरोना प्रादुर्भावाचं प्रमाण घटल्यानेच रुग्ण दुपटीचा कालावधी देखील घसरल्याचं निरिक्षण नोंदवण्यात आलं आहे.

मुंबईत कोरोना रुग्णाच्या दुपटीचा कालावधी २५० दिवसांवर
SHARES

मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी २५० दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. मुंबईत आॅक्टोबरपासून कोरोना प्रादुर्भावाचं प्रमाण घटल्यानेच रुग्ण दुपटीचा कालावधी देखील घसरल्याचं निरिक्षण नोंदवण्यात आलं आहे.

मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर कमी होऊन तो सरासरी ०. २७ टक्क्यापर्यंत खाली आला आहे. याआधी ५ नोव्हेंबर रोजी मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी २०८ दिवसांवर आला होता. तर रुग्ण वाढीचा सरासरी दर ०. ३३ टक्के इतका होता.  

मुंबईमध्ये याआधी २० ऑक्टोबर रोजी कोरोना रुग्णाच्या दुपटीचा दर १०० दिवसांवर आला होता. २४ ऑक्टोबर रोजी रुग्ण दुपटीचा दर १२६ दिवसांवर गेला. २९ ऑक्टोबर रोजी रुग्ण दुपटीचा दर १५० दिवसांवर गेला. ५ नोव्हेंबर रोजी रुग्ण दुपटीचा दर २०८ दिवस इतका झाला, तर १४ नोव्हेंबर रोजी रुग्ण दुपटीचा दर २५५ दिवसांवर जाऊन पोहोचला.

हेही वाचा- कोरोनाची दुसरी लाट आल्यास मुंबई महापालिका पूर्णपणे सज्ज - चहल

दिवाळी आणि थंडीच्या मोसमास कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या दृष्टीने महापालिकेने योग्य ती खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यास मुंबई महापालिका पूर्णपणे सज्ज असल्याचं महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं. दिवाळीत कोरोना वाढण्याची शक्यता असल्याने मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे.

चहल म्हणाले की, नागरिकांनी नियमावलीचं पालन केलं नाही तर कोरोनाचा धोका आणखी वाढेल. त्यामुळे लोकांनी मास्क, सॅनिटायझरसह सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पूर्णपणे पालन करायला हवं. तसंच कोरोनाची दुसरी लाट आली तर ती थोपवण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज आहे. महापालिकेकडे सध्या पुरेसे बेड उपलब्ध आहेत.

कोरोना रुग्णांची घटलेली संख्या पुन्हा वाढू नये यासाठी नियमावलीची दिवाळीत कडक अंमलबजावणी करणार आहोत. मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. दररोज २५ हजार लोकांवर कारवाई केली जाणार असल्याचं चहल यांनी सांगितलं. आधी दररोज ९ ने १० हजार लोकांवर कारवाई केली जात होती. 

(covid 19 patients doubling rate increase by 250 days in mumbai says bmc)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा