Advertisement

कोरोनाची दुसरी लाट आल्यास मुंबई महापालिका पूर्णपणे सज्ज - चहल

दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीत कोरोना वाढण्याची शक्यता असल्याने मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. मुंबईत यंदा दिवाळीत फटाके फोडण्यास आणि आतषबाजी करण्यास पालिकेने बंदी घातली आहे.

कोरोनाची दुसरी लाट आल्यास मुंबई महापालिका पूर्णपणे सज्ज - चहल
SHARES

कोरोनाची दुसरी लाट आल्यास मुंबई महापालिका पूर्णपणे सज्ज असल्याचं महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सांगितलं. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीत कोरोना वाढण्याची शक्यता असल्याने मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. मुंबईत यंदा दिवाळीत फटाके फोडण्यास आणि आतषबाजी करण्यास पालिकेने बंदी घातली आहे.

चहल म्हणाले की, नागरिकांनी नियमावलीचं पालन केलं नाही तर कोरोनाचा धोका आणखी वाढेल. त्यामुळे लोकांनी मास्क, सॅनिटायझरसह सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पूर्णपणे पालन करायला हवे. तसेच कोरोनाची दुसरी लाट आली तर ती थोपवण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज आहे. महापालिकेकडे सध्या पुरेसे बेड उपलब्ध आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली आहे. ही संख्या पुन्हा वाढू नये यासाठी नियमावलीची दिवाळीत कडक अंमलबजावणी करणार आहोत. मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. दररोज २५ हजार लोकांवर कारवाई केली जाणार असल्याचं चहल यांनी सांगितलं. आधी दररोज ९ ने १० हजार लोकांवर कारवाई केली जात होती. 

मुंबई पोलिस आणि महापालिका प्रशासनाने सकाळी झालेल्या बैठकीत मुंबईतील गर्दीची ठिकाणं निश्चित केले आहेत. अशा गर्दीच्या ठिकाणांवरील पोलीस बंदोबस्त वाढवला जाणार आहे. लक्ष्मीपूजन वगळता इतर दिवशी फटाके फोडण्यावर बंदी आहे. सार्वजनिक ठिकाणीदेखील फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे.हेही वाचा-

अर्णब गोस्वामींना जामीन नाहीच, उच्च न्यायालयाने फेटाळला अर्ज

महानगरपालिका क्षेत्रात फटाके फोडणं किंवा आतषबाजी करण्यावर बंदी


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
POLL

आजच्या पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स किती धावांचा डोंगर रचेल, असे वाटते ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा