Advertisement

कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यासाठी महापालिका आयुक्तांची तयारी

मुंबई महानगपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी वाढत्या कोरोना परिस्थितीवर आणि कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यासाठी आरोग्य यंत्रणेची तयारी केली आहे.

कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यासाठी महापालिका आयुक्तांची तयारी
SHARES

मुंबईत बुधवारी मुंबईत ५ हजार ३६५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ही रुग्णवाढ आतापर्यंतची सर्वोच्च रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. मुंबई महानगपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी वाढत्या कोरोना परिस्थितीवर आणि कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यासाठी आरोग्य यंत्रणेची तयारी केली आहे. 'मुंबईत सध्या १३,७७३ कोरोना रुग्णांसाठी बेडची संख्या आहे. यातील ५,१४० बेड रिकामे आहेत. परंतु भविष्याचा विचार करता या बेडची संख्या २१ हजार करण्यात येणार आहे', असं मुंबई महानगपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं.

मुंबईत बुधवारी ४७,००० कोरोना चचाण्या करण्यात आल्या यामध्ये ५,३६५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये १२ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली आहेत. तर उर्वरित ८४% रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली नाहीत. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता मुंबईतील बेड वाढवण्याची तयारी मुंबई महापालिकेने केली आहे.

अगामी दिवसांत मुंबईत कोरोना चाचण्या वाढवण्यात येणार असल्यामुळं मुंबईतील बेडची संख्या वाढवण्यात आली आहे. ज्या रुग्णांना कोरोना लक्षणे आहेत. अशा रुग्णांना रुग्णालयात बेडची आवश्यकता आहे. एका दिवसात १० हजार रुग्णांना बेड उपलब्ध करण्याच्या हेतूने ही बेडची संख्या वाढवण्यात आली आहे. एक दिवसाला ६०,००० कोरोना चाचण्या करणार असल्याचे प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

मुंबईत १० लाख जणांना कोरोना लसीकरण देण्यात आले आहे. आगामी दिवसात कोरोना लसीकरण वाढवणार असून एका दिवसाला १ लाख जणांना कोरोना लसीकरण करणार असल्याचे म्हटले आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची परिस्थिती वाढली आहे. परंतु वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने सर्व तयारी केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी परिस्थीती हाताळण्यास मुंबई महानगरपालिका सक्षम असल्याचे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी म्हटलं.



हेही वाचा -

भांडूपच्या मॉलमधील रुग्णालयाला भीषण आग, २ जणांचा मृत्यू

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा