Advertisement

जे.जे. रुग्णालयात आता ‘कोव्हॅक्सिन’ पाठोपाठ ‘कोविशिल्ड’ही उपलब्ध


जे.जे. रुग्णालयात आता ‘कोव्हॅक्सिन’ पाठोपाठ ‘कोविशिल्ड’ही उपलब्ध
SHARES

कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र असं असलं तरी राज्यातील नागरिकांसाठी एक दिलासादायक माहिती आहे. मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात आता ‘कोव्हॅक्सिन’ पाठोपाठ ‘कोविशिल्ड’ लसदेखील देणे सुरू होणार आहे. त्यामुळे या दोन्ही लशी आता रुग्णालयात उपलब्ध असणार आहे.

मुंबईत जे.जे. रुग्णालय हे ‘कोव्हॅक्सिन’ लशीचे एकमेव केंद्र आहे. त्यात ‘कोव्हॅक्सिन’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. त्यामुळे याच्या परिणामकारकता आणि प्रभावीपणाबाबत साशंकता असल्याने सुरुवातीला प्रतिसाद कमी होता; परंतु आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू झाल्यापासून हळूहळू प्रतिसाद वाढला आहे.

जेजेमध्ये ‘कोव्हॅक्सिन’चे लसीकरण सुरू केले तेव्हा एकीकडे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना ‘कोविशिल्ड’ आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ‘कोव्हॅक्सिन’ हा भेदभाव का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यामुळे जेजेमध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी लसदेखील घेतलेली नाही. कोव्हिशिल्ड लस उपलब्ध झाल्यानंतर जे कर्मचारी कोविशिल्ड लशीसाठी थांबलेले आहेत, ते लसीकरणासाठी येतील.

लसीकरणाची क्षमता वाढविण्यासाठी आता ‘कोविशिल्ड’चे लसीकरणही जे.जे.मध्ये सुरू केले आहे. सोमवार ते गुरुवार ‘कोव्हॅक्सिन’ आणि शुक्रवारी आणि शनिवारी ‘कोविशिल्ड’ असे दोन्ही लशींचे नियोजन केले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा