Advertisement

मुंबईत म्युकरमायकोसिसच्या 'इतकी' रुग्णांमध्ये घट


मुंबईत म्युकरमायकोसिसच्या 'इतकी' रुग्णांमध्ये घट
SHARES

मुंबईत सध्या कोरोनाच्या रुग्णांचा आलेख हा वर-खाली होत आहे. अनेकदा रुग्णांमध्ये वाढ होतेय तर, कधी कमी. त्यामुळ अद्याप नागरिकांवर कोरोनाची टांगती तलवार आहेच. दरम्यान, कोरोनाशिवाय, काही महिन्यांपूर्वी म्युकरमायकोसिस हा नवा आजार आला. या आजाराचे अनेक रुग्ण मुंबईत आढळू लागले. परंतू, सध्या दिलासादायक बाब म्हणजे मुंबईत म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये ५६ टक्क्यांनी घट झाली आहे. सध्या म्युकरचे १६९ रुग्ण उपचाराधीन आहेत.

मुंबईमध्ये आतापर्यंत ८२५ काळ्या बुरशीचे रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी ७० टक्के रुग्ण मुंबईबाहेरून उपचारासाठी शहरात दाखल झाले आहेत. मुंबईत २७ जून रोजी ३८४ सक्रिय रुग्ण होते, तर बुधवारी ही संख्या १६९ झाली आहे. म्हणजेच रुग्णांची संख्या अर्ध्यावर गेली आहे. आतापर्यंत १३९ रुग्ण केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले असून, त्यापैकी ६३ सध्या उपचार घेत आहेत. तर, जेजेमध्ये १४५ वरून १३ रुग्ण, नायरमध्ये ४६ वरून २२, सायनमध्ये ७८ वरून २४ आणि कूपरमध्ये ४२ वरून ११ रुग्ण उपचार घेत आहेत.

काळ्या बुरशीच्या उपचारासाठी आतापर्यंत महानगरपालिकेनं ३१,२४८ कुपी खरेदी केल्या आहेत. यात इंजेक्शनचे २ प्रकार आहेत. एका कुपीची सरासरी किंमत ६ हजार रुपये असते, त्यामुळे रुग्णांना केवळ १८ कोटी रुपयांचे इंजेक्शन्स दिली जात आहेत. कोविड-१९ मधील रुग्णांची दैनंदिन संख्या कमी झाल्याने गेल्या एक महिन्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.




हेही वाचा -

लसीकरण पुर्ण झालेल्यांना मिळणार लोकल प्रवासाची परवानगी?

एकाचवेळी दोन्ही हातांवर लस; कोरोनाच्या तिसऱ्या लसीची यशस्वी चाचणी


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा