लोअर परळ डेंग्यूच्या कचाट्यात

 Lower Parel
लोअर परळ डेंग्यूच्या कचाट्यात

लोअर परळ - स्मार्ट सिटी प्रकल्पात केंद्रस्थानी असणारे लोअर परळ डेंग्यूच्या कचाट्यात अडकले आहे. या विभागात अनेक इमारतींचे बांधकाम आणि नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरून डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. इथल्या मानाजी राजुजी चाळ, नवी चाळ, हरी बाग आणि चिरायू सोसायटीत डेंग्यूचे काही रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याविषयी अतिदक्षतेचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. पालिकेचा आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने डेंग्यूची वेळ ओढावली असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

Loading Comments