• 5 वर्षात डेंग्युचे रुग्ण वाढले
SHARE

मुंबई - गेल्या 5 वर्षात मुंबईत डेंग्युचे रुग्ण वाढल्याचे प्रजा फाउंडेशनने केलेल्या डेंग्युच्या अहवालातून समोर आले आहे. फोर्ट येथील प्रजा फाउंडेशनच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

एप्रिल 2011 ते मार्च 2012 साली 1, 879 डेंग्युचे रुग्ण आढळले, मात्र एप्रिल 2015- मार्च 2016 ला ही आकडेवारी 15 हजार 244 वर गेली आहे. एप्रिल 2011 ते मार्च 2012 मध्ये 62 तर एप्रिल 2015 ते डिसेंबर 2015 ला 124 नागरिकांना डेंग्यूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

अंधेरी, सांताक्रूझ, परेल, दहिसर, ग्रांटरोड,माटुंगा, अंधेरी पूर्व या भागात एप्रिल 2011 ते डिसेंबर 2015 मध्ये डेंग्यूमुळे सर्वाधिक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.

वय - मृतांची टक्केवारी

0 ते 19 वर्षे . 42. 02 %
20 ते 59 वर्षे . 42. 65 %
60 वर्षे व अधिक 13.87 %

संबंधित विषय
ताज्या बातम्या