Advertisement

गोवरसाठी 'धारावी मॉडेल', पालिका लसीकरणावर भर देणार

गोवर संसर्गाचा प्रादुर्भाव एम वॉर्डप्रमाणेच धारावीमध्ये पसरत आहे.

गोवरसाठी 'धारावी मॉडेल', पालिका लसीकरणावर भर देणार
SHARES

गोवर संसर्गाचा प्रादुर्भाव एम वॉर्डप्रमाणेच धारावीमध्ये पसरत आहे. धारावीसारख्या झोपडट्टीमध्ये गोवरचा संसर्ग वेगाने होऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणा सातत्याने प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आता गोवर संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी ‘धारावी मॉडेल’चा वापर करण्यात येणार आहे.

कोरोना संसर्गाच्या काळात आशा कर्मचाऱ्यांची मदत घेऊन घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले होते. सहआजार असलेल्या व्यक्तींची नोंद घेऊन त्यांना करोनाची लागण झाली असल्यास तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यावर भर देण्यात आला होता. त्याचप्रकारे गोवरची साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

एम वॉर्डप्रमाणे धारावीमध्येही स्थलांतरित कामगारांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे संसर्गाचा फैलाव हा एका रुग्णांकडून दुसऱ्या रुग्णांकडे वेगाने होऊ शकतो.

संसर्गाचा उद्रेक रोखण्यासाठी शून्य ते पाच वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना ताप, अंगावर पुरळ अशी लक्षणे आढळल्यास योग्य औषधोपचार तसेच गोवरविरोधी लसीकरण तसेच नियमित लसीकरणावर भर देण्यात येणार आहे.

एम वॉर्डमध्ये लहान मुलांमध्ये किती जणांचे लसीकरण राहिले आहे, कितीजणांना तातडीने लसीकरण करण्याची गरज आहे अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर पालिका सक्षमपणे काम करत आहे. शून्य ते पाच वयोगटातील गोवर रुबेला लसीकरणासाठी पात्र लाभार्थी शोधून त्यांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे.

झोपडपट्ट्यांमध्ये आत्तापर्यंत एकूण ११९ शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील दहा दिवसांत पन्नास लसीकरण शिबिरे घेण्यात येणार आहेत. वॉर रुमच्या मदतीने गोवरचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी तसेच आजाराची माहिती देणे व लसीकरणासाठी विविध सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्या रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्याची गरज आहे, त्यांची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देणे अपेक्षित आहे.



हेही वाचा

mumbai"="" target="_blank">Mumbai: प्रथमच, खाजगी रुग्णालय विनामूल्य ई-ओपीडीची सुविधा">Measles Outbreak In Mumbai: प्रथमच, खाजगी रुग्णालय विनामूल्य ई-ओपीडीची सुविधा

मुंबईत गोवरचं थैमान! सव्वा वर्षाच्या मुलीचा मृत्यू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा