Advertisement

बोरिवली, कांदिवली, दहिसरमध्ये धारावी पॅटर्न

उत्तर मुंबईतील दहिसर, बोरिवली, कांदिवलीत कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे.

बोरिवली, कांदिवली, दहिसरमध्ये धारावी पॅटर्न
SHARES

मुंबईत कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरलेल्या धारावीत आता कोरोनाला रोखण्यात मुंबई महापालिकेला यश आलं आहे. मात्र, उत्तर मुंबईतील दहिसर, बोरिवली, कांदिवलीत कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे धारावी पॅटर्न राबवण्याचा निर्णय पालिकेच्या परिमंडळ ७ ने घेतला आहे.


उत्तर मुंबईत धारावी पॅटर्नच्या धर्तीवर घरोघरी स्क्रिनिंग, मोबाईल क्लिनिक, स्ट्रिक कंटेनमेंट आणि प्रभावीपणे क्वारंटाइन मोहीम राबवली जात आहे. `मिशन झिरो’अंतर्गत दहिसर, बोरिवली, कांदिवलीत तीन दिवसांत १६ आरोग्य शिबिरे घेतली आहेत. तर १५ मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून  १ हजार ९५ जणांचे स्क्रिनिंग केले आहे. यामध्ये संशयित आढळलेल्या १८ जणांपैकी ५ पाच जण पॉझिटिव्ह ४ जण निगेटिव्ह आढळले आहेत. तर १० रिपोर्ट प्रलंबित आहेत.


पालिकेच्या झोन ७ मध्ये येणाऱ्या आर दक्षिण ( कांदिवली), आर मध्य (बोरिवली) आणि आर उत्तर ( दहिसर) विभागात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. एखाद्या इमारतीत कोरोनाबाधित आढळल्यास संपूर्ण इमारत सिल केली जात आहे. कंटेनमेंट झोनमधील चारपैकी तीन रस्ते सील करून अत्यावश्यक सेवेची गैरसोय होऊ नये म्हणून फक्त एक रस्ता सुरू ठेवण्यात येत आहे.


कोरोनाबाधित आढळल्यास परिसरातील सर्वांचे स्क्रिनिंग, लक्षणे आढळल्यास तातडीने कोरोना चाचणी करण्यात येत आहे.. यामध्ये मोबाईल व्हॅनचा मोठा फायदा होत असून सध्या प्रतिदिन सुमारे अडीच ते तीन हजार जणांचे स्क्रिनिंग करण्यात येत आहे. या तिन्ही विभागात सध्या २०५९ ऍक्टिव्ह केसेस असून २०८९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा