Advertisement

धारावीत आठव्यांदा कोरोना रुग्णसंख्या शून्य

मुंबईत सध्या ४१९६ रुग्ण उपचार घेत आहेत. यामधील केवळ १४४० रुग्णांना लक्षणे आहेत. तर २२८४ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत.

धारावीत आठव्यांदा कोरोना रुग्णसंख्या शून्य
SHARES

मुंबईत कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरलेली धारावी आता कोरोनाचा फैलाव रोखण्यात आघाडीवर आहे. धारावीमध्ये रविवारी कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. धारावीत एकही रुग्ण न सापडण्याची या महिन्यातील ही दुसरी वेळ आहे. 

फेब्रुवारी मध्यापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. या दुसऱ्या लाटेमध्ये आठव्यांदा धारावीत एकही रुग्ण सापडला नाही. धारावीला लागून असलेल्या माहीम आणि दादरमध्येही रुग्णसंख्या घटली आहे. रविवारी दादरमध्ये सहा, तर माहीममध्ये अवघे चार रुग्ण आढळले आहेत.

धारावीत याआधी १४ आणि १५ जूनला सलग दोन दिवस एकही रुग्ण आढळला नव्हता. त्यानंतर २३ जून, ४ जुलै, ७ जुलै आणि १७ जुलै तसेच तीन ऑगस्टला एकही रुग्ण सापडला नव्हता. सॅण्डहर्स्ट रोड येथील बी विभागात रविवारी सलग पाचव्यांदा एकही  रुग्ण आढळला नाही.

मुंबईत सध्या ४१९६ रुग्ण उपचार घेत आहेत. यामधील केवळ १४४० रुग्णांना लक्षणे आहेत. तर २२८४ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. एकूण उपचाराधीन रुग्णांपैकी सर्वात जास्त रुग्ण अंधेरी, जोगेश्वरी परिसरात आहेत. अंधेरी, जोगेश्वरीचा पश्चिम भाग असलेल्या के  पश्चिम भागात ३२८ रुग्ण आहेत. तर पूर्व भागात म्हणजेच के  पूर्व मध्ये २०२ रुग्ण आहेत. 

त्याखालोखाल मलबार, ग्रॅंट रोडचा भाग असलेल्या डी विभागात २६५ रुग्ण आहेत. तर वांद्रे, सांताक्रूज पश्चिमेचा भाग असलेल्या एच पश्चिममध्ये २५० रुग्ण आहेत.  सर्वात कमी उपचाराधीन ८ रुग्ण मशीद बंदर, डोंगरीचा भाग असलेल्या बी विभागात  आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा