घरोघरी सगळेच आजारी !

दादर - पालन सोजवाल बिल्डींगमध्ये राहणारे बहुतांश लोक काविळीसारख्या आजाराने त्रस्त आहेत. इथे एकूण 350 कुटुंबं राहतात. त्यातल्या काहींना मलेरिया, चिकनगुनीयाची बाधा झालीये. तर तब्बल 80 लोकांना कावीळ झालीय. आणि त्याला कारणीभूत आहे ते या वसहतीला पुरवठा होणारे दूषित पाणी. गेल्या चार वर्षांपासून या वसाहतीत दुषित पाणी पुरवठा होतोय.​ दुषित पाणी पुरवठा होत असल्याने रहिवासी पाणी विकत आणत आहेत. रहिवाशांनी यावर उपाय म्हणून दोन वेळा स्वखर्चाने पाईपलाईनची दुरुस्ती केली. पण पुन्हा या रहिवाशांना दुषित पाण्याचा सामना करावा लागला.

मलेरिया, कावीळ या आजारावर उपाय म्हणून पालिकेने फक्त जनजागृती करण्यासाठी जागोजागी बॅनरबाजी केली आहे. मात्र दूषित पाण्यावर कायमस्वरूपी उपाययोजना मात्र करण्यात आलेली नाही..त्यामुळे पालिकेला जाग कधी येणार असा प्रश्न रहिवासी करत आहेत.

Loading Comments