कांदिवली - बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयातील डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली आहे. तसेच रूग्णालयाचीही तोडफोड करण्यात आली. गणेश नगर परिसरात दोन गटांमध्ये हामामारी झाली. या वेळी दोन्ही गटातील काही जण जखमी झाले. जखमींना बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले. पण रूग्णालयातही दोन्ही गटात हाणामारी झाली. भांडण सोडवण्यासाठी डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी केली. या वेळी डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकावर हल्ला करण्यात आला.
याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. जितेंद्र धुलिया, इलियास बालिम आणि धर्मेंद्र धुलिया अशी तिघांची नावे आहेत. पण अजून एक आरोपी फरार असल्याची माहिती कांदिवली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मुकुंद पवार यांनी दिली.