डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू?

घाटकोपर - घाटकोपरमधील दिशा रुग्णालयाचा हलगर्जीपणा समोर आलाय. रविवारी उपचारासाठी दाखल झालेल्या संगीता कदम नावाच्या एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. याच निषेधार्थ संगीताच्या कुटुंबाने आणि परिसरातील स्थानिकांनी रुग्णालयाला घेराव घातला आणि रुग्णालयाचं लायसन्स जप्त करण्याची मागणी केली. संगीतावर गेल्या आठवड्यापासून दिशा रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी तब्बेत बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केलं गेलं. पण, लगेच उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा संगीताच्या नातेवाईकांचा आरोप आहे. तर, अशा प्रकारच्या घटना रुग्णालयात वारंवार घडत असल्याचं ही समोर आलंय. संगीताच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी जबाबदारी घ्यायलाही नकार दिला. त्यामुळे पुन्हा एकदा डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.

Loading Comments