• ३० मिनिटात काढली चिमुकलीच्या श्वसननलिकेतून इअररिंग
SHARE

लहान मुलं कधी काय करतील याचा काही नेम नसतो. त्यासाठी पालकांना डोळ्यात तेल घालून मुलांवर लक्ष ठेवावं लागतं. तरीही मुलं त्यांचा डोळा चुकवून काही ना काही पराक्रम करतातच.  असाच एक अनुभव मुंबईत राहणाऱ्या १२ महिन्यांच्या कुशी सोनीच्या बाबतीत अाला. कुशीने अनवधानाने इअररिंग गिळली.  जेरबाई वाडिया बालरुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने ब्रॉन्कोस्कोपी केली आणि ती रिंग ३० मिनिटात बाहेर काढली. आता कुशीची प्रकृती स्थिर आहे.

अशी गिळली इअररिंग

खेळताना कुशीने इअररिंग गिळली. इअररिंग अडकल्याने तिला ताप आणि खोकला येऊ लागला. आपल्या बाळाची तब्येत ठीक नाही असं कळताच तिच्या आईने तिला बालरोग तज्ज्ञांकडे नेलं.  डॉक्टरांनी तपासणी करून औषधे दिली.  पण त्याने काहीच दिलासा मिळाला नाही. तिची तब्येत अाणखी खालावल्याने कुशीला तीन दिवस सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी एक्स-रे काढला. पण काहीच निदान झालं नाही. कारण ही वस्तू गळ्याच्या वरच्या भागात अडकली होती. कुशी पुढील ३ दिवस खासगी रुग्णालयात होती.  पण तिची प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं तिला जेरबाई वाडिया बालरुग्णालयात दाखल करण्यात आलं.ब्रॉन्कोस्कोपीमार्फत काढली इअररिंग

जेरबाई वाडिया बालरुग्णालयात कुशी दाखल झाल्यानंतर ३० मिनिटांत तिच्यावर उपचार करण्यात आले.  एक्स-रे काढल्यानंतर तिच्या शरीरात वस्तू असल्याचं निश्चित झालं. तिला तात्काळ ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. एन्डोट्रॅकिअल ट्युब काढली आणि ब्रॉन्कोस्कोपी करून इअररिंग काढून टाकली. या जीव वाचविणाऱ्या उपचारांसाठी शस्त्रक्रिया किंवा ट्रॅकेओस्टोमी करण्याची आवश्यकता भासली नाही. आता मुलीला एक्स्ट्युबेट करण्यात आले आहे आणि ती सामान्यपणे आहार घेत आहे, असे कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. दिव्य प्रभात म्हणाले.अशा रुग्णांची स्थिती अत्यंत गुंतागुंतीची असते आणि त्यांच्यावर तातडीनं उपचार करणं आवश्यक असतं.  हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी लगेचच परिस्थिती हाताळली.  आता कुशीच्या प्रकृतीला धोका नाही.  - डॉ. मिनी बोधनवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, वाडिया हॉस्पिटलहेही वाचा -

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप सुरुच

रक्त संकलनात महाराष्ट्र देशात अव्वल


 

संबंधित विषय
ताज्या बातम्या