Advertisement

रक्त संकलनात महाराष्ट्र देशात अव्वल


रक्त संकलनात महाराष्ट्र देशात अव्वल
SHARES

रक्तदान हेच श्रेष्ठदान असं म्हणत महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात 27 हजार रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून 16 लाख रक्तपिशव्यांचं संकलन करण्यात आलं. त्यामुळे देशभरात रक्त संकलनमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचं राज्य ठरलं आहे.


महाराष्ट्रचं अव्वल !

महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी 8 लाख असून लोकसंख्येच्या प्रमाणात 12 लाख रक्त पिशव्यांचं संकलन आवश्यक आहे. मात्र, गेल्या वर्षात 16 लाख रक्त पिशव्यांचं संकलन करण्यात आलं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्त संकलन करून महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर ठरला आहे. देशभरातील 36 राज्यांची एकूण रक्त संकलनाची टक्केवारी 71 टक्के आहे. त्यातील सर्वाधिक महाराष्ट्राची (97 टक्के) असून त्या खालोखाल सिक्कीम (96 टक्के), त्रिपुरा (95 टक्के), तामिळनाडू (93 टक्के), चंदीगड (91 टक्के) अशी आकडेवारी आहे.


मुंबईमध्ये सर्वाधिक रक्तपेढ्या

राज्यात सर्वाधिक रक्तपेढ्या मुंबईत (60) असून त्या पाठोपाठ पुणे (33), ठाणे (23), सांगली आणि सोलापूर (प्रत्येकी 17), नाशिक (16), अहमदनगर आणि नागपूर (प्रत्येकी 14), कोल्हापूर (13) आणि जळगाव (10) अशी संख्या आहे.


यशस्वी रक्तदान मोहीम

महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत 97.54 टक्के एवढ्या प्रमाणात स्वैच्छिक रक्तदान झालं आहे. राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याने सक्रियरित्या रक्तनदान मोहिमेत भाग घेतला. एकूण 35 जिल्ह्यांमध्ये 332 रक्तपेढ्यांच्या माध्यमातून रक्त संकलन केलं जातं.


गरजू लोकांना फायदा 

स्वैच्छिक रक्तदानामार्फत मिळालेलं रक्त अशक्त माता, बालकं, अपघातग्रस्त रुग्ण, कर्करुग्ण, थॅलेसिमिया, हिमोफिलिया, सिकलसेल आणि रक्ताच्या अन्य आजारांसाठी वापरलं जातं.

जास्तीत जास्त लोकांनी स्वैच्छिक रक्तदानाविषयी जागृक होण्यासाठी ठिकठिकाणी जिल्हा पातळीवर रक्तदान शिबिर, प्रभातफेरी, विविध स्पर्धा, रक्तदात्यांचं सत्कार आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावर्षी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त 'बी देअर फॉर' या संपल्पनेनुसार आणि 'गिव्ह ब्लड, शेअर लाइफ' या घोषवाक्याचा वापर करण्यात आला आहे. नागरिकांनी महाराष्ट्रातील रक्तदानाची परंपरा कायम राखावी.
- दिपक सावंत , आरोग्यमंत्री

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा