Advertisement

एसआरए इमारतीत रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील, उत्तर मुंबईत अंमलबजावणी

मुंबईत एखाद्या इमारतीत कोरोना रुग्ण आढळल्यास फक्त मजलाच सील केला जात आहे. मात्र, आता आता एसआरएच्या इमारती कोरोना रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारतच सील केली जाणार आहे.

एसआरए इमारतीत रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील, उत्तर मुंबईत अंमलबजावणी
SHARES

मुंबईत एखाद्या इमारतीत कोरोना रुग्ण आढळल्यास फक्त मजलाच सील केला जात आहे. मात्र, आता आता एसआरएच्या इमारती कोरोना रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारतच सील केली जाणार आहे. या ठिकाणी  कंटेन्मेंट झोन जाहीर केला जाणार आहे. पूर्ण इमारतच सील करण्याच्या निर्णयाची उत्तर मुंबईत अंमलबजावणी केली जात आहे. 

एसआरएच्या इमारतींमध्ये अधिक रुग्ण आढळून येत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे एसआरएच्या इमारतींमध्ये रुग्ण आढळल्यास फक्त मजला सील न करता संपूर्ण इमारतच सील करून कंटेन्मेंट झोन क्षेत्र म्हणून जाहीर करण्याचा निर्णय परिमंडळ उपायुक्तांनी घेतला आहे. लॉकडाऊन केलेल्या इमारतींसह कंटेन्मेंट झोनमध्ये नियम न पाळणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे.

झोपडपट्टयांसह कंटेन्मेंट झोन असलेल्या भागात नियम पाळले जात नाहीत.  मास्क न लावता फिरणे, गप्पा मारत बसणे यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. संसर्ग अधिक पसरू नये यासाठी पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या भागांमध्ये रुग्ण आढळून येत आहेत, तसंच जे बाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत, तिथे पोलिसांकडून कडक कारवाई  केली जाणार आहे. मात्र, येथील वाढती रुग्ण संख्या विचारात घेता पुढील काही काळ रुग्ण सापडत असलेले परिसर व बाधित क्षेत्र आदी ठिकाणी लॉकडाऊन घेत ही संख्या नियंत्रणात आणण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.



हेही वाचा -

G South पालिकेच्या कार्यालयात 'अशी' घेतली जातेय कर्मचाऱ्यांची काळजी

३० मिनिटात कोरोनाचं निदान, पालिकेचं 'मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग'




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा