उकाड्यामुळे पशु-पक्षीही हैराण


  • उकाड्यामुळे पशु-पक्षीही हैराण
  • उकाड्यामुळे पशु-पक्षीही हैराण
  • उकाड्यामुळे पशु-पक्षीही हैराण
  • उकाड्यामुळे पशु-पक्षीही हैराण
  • उकाड्यामुळे पशु-पक्षीही हैराण
  • उकाड्यामुळे पशु-पक्षीही हैराण
SHARE

वाढत्या उन्हाचा त्रास आपल्याला एवढा होत असेल तर, याच उन्हाचा त्रास पक्षांना किती होत असेल, याचा आपण विचारही करू शकत नाही. मुंबईत दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत चालला आहे. मुंबई परिसरातील आर्द्रता कमालीची वाढलेली असून, पुढच्या 24 तासांत तापमान आणखी एका अंशाने वाढणार आहे. वातावरणात वारंवार होणाऱ्या तापमानाचा जास्त फरक हा पक्षांवर पडतो. गेल्या चार महिन्यांत परळ इथल्या पशुवैद्यकीय रुग्णालयात जवळपास हजारापेक्षा जास्त पशु-पक्ष्यांवर उपचार करण्यात आले आहेत. एप्रिल महिन्यात जवळपास 350 पेक्षा जास्त पशु-पक्ष्यांवर उपचार करण्यात आले आहेत. तर, अजूनही 550 पशु-पक्ष्यांवर उपचार सुरू आहेत.

पशुवैद्यकीय रुग्णालयाचे सचिव डॉ. जे. सी. खन्ना यांना याबाबत विचारलं असता ‘दरवर्षीपेक्षा या वर्षी 20 ते 25 टक्के जास्त पशु-पक्षी उपचारांसाठी दाखल झाले आहेत. पक्षांना विसाव्यासाठी जागा मिळत नसल्याने पक्षी आकाशात फिरत असतात. शरीरातलं पाणी कमी झाल्यामुळे काही वेळा पक्षी जमिनीवर कोसळतात. त्यात त्यांचा मृत्यू होतो. दिवसभर उडत राहिल्याने उष्माघातासारखे त्रास पक्षांनाही होतात. 

जर पक्षी दिवसभर उडत असतील आणि त्यांना प्यायला पाणी मिळालं नाही तर ते खाली कोसळतात, किंवा ते झाडांच्या फांदीमध्ये अडकतात, तारेमध्ये अडकतात. मग, काही प्राणी-पक्षी मित्र अशा पक्ष्यांना रुग्णालयात घेऊन येतात किंवा आमचे काही सहकारी अशा पक्ष्यांना रुग्णालयात घेऊन येतात. त्यानंतर त्यांना पाण्यातून ग्लुकोज, मल्टीव्हिटामिन अॅन्टीबॉयोटिक्स सिरप देण्यात येतं. दररोज 10 पेक्षा जास्त पक्षी रुग्णालयात येतात. त्यामुळे महिन्यात 300 ते 350 पक्षी येतात. यात जवळपास 70 ते 75 टक्के संख्या कबुतरांची  आहे. घुबड, घार, पोपट,कोकीळ,सी-बर्ड्स असे अनेक पक्षी रुग्णालयात दाखल होतात.आपल्या घराच्या गॅलरीत पक्षांसाठी छोट्या वाटीत साफ पाणी आणि त्यांना जेवण म्हणून वाटीत चणे, ज्वारी असे दाणे ठेवा जेणेकरुन पक्षांना ते सहज खाता येईल. दोन ते तीन वेळा वाटीतील पाणी बदला आणि थोडा खाऊ म्हणून धान्यांचे दाणे टाका अशाने आपण पक्षांचे प्राण वाचवू शकतो, असा सल्ला डॉ.जे.सी.खन्ना यांनी दिला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या