मालाडकरांचा नेत्रदानाचा संकल्प

 Malad
मालाडकरांचा नेत्रदानाचा संकल्प
मालाडकरांचा नेत्रदानाचा संकल्प
मालाडकरांचा नेत्रदानाचा संकल्प
See all

चिंचोली बंदर - नववर्षाच्या सुरुवातीला दृष्टी परिवार असोसिएशन फॉर ब्लाइंड पीपल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा क्रमांक 50 च्या वतीने नेत्रदान शिबीर 2017 चे आयोजन करण्यात आलं होतं. मालाड पश्चिमेकडील चिंचोली बंदर येथील मनसे शाखेत हे शिबीर घेण्यात आले.

3 आणि 4 जानेवारी रोजी आयोजित या नेत्रदान शिबिरात दृष्टीहीन बांधवांनी मालाडमधील जनतेला नेत्रदानाचे आवाहन केले. यावेळी मालाडकरांनी या शिबिराला उत्तम प्रतिसाद देत नेत्रदानाचा संकल्प केला. मनसे गड क्रमांक 50 चे शाखाध्यक्ष हरेष साळवी यांनी या नेत्रदानाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला. जवळपास 27 जणांनी यावेळी नेत्र दानाचे फॉर्म जमा केले. नेत्रदान ही काळाची गरज असून दिवसेंदिवस जनजागृतीमुळे नेत्रदानाचा आकडा वाढत असल्याचे दृष्टी परिवाराचे अध्यक्ष ज्ञानेश जोशी यांनी सांगितले.

Loading Comments