बाप्पाच्या प्रसादावर एफडीएची नजर

  Mumbai
  बाप्पाच्या प्रसादावर एफडीएची नजर
  मुंबई  -  

  गणेशोत्सवाच्या काळात एफडीएच्या विशेष मोहिमेला आजपासून सुरूवात झाली आहे. यंदा अन्नपदार्थांचे नमुने घेत त्यांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती एफडीएतील सुत्रांनी दिली आहे. तर ग्राहकांनी खवा-मावा आणि इतर अन्नपदार्थ नोंदणी-परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावेत. तसेच त्यांचे बिलही घ्यावे असे आवाहन एफडीएकडून ग्राहकांना करण्यात आले आहे. बाप्पाच्या आगमनाला अवघ्या तीन दिवसच उरले असून सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. असे असताना बाप्पासाठी तयार होणार प्रसाद, महाप्रसाद खरेदी करताना नेहमीच सावधानता बाळगावी लागते. सणासुदीच्या काळात खवा-मावा आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ होण्याचे प्रकार वाढतात. त्यामुळे होणारी विषबाधा रोखण्यासाठी एफडीएने हे पाऊल उचलले आहे. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.