Advertisement

मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आणखी ५ कोरोना केंद्र

मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापालिका सतर्क झाली असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी तयारीला सुरूवात केली आहे.

मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आणखी ५ कोरोना केंद्र
SHARES

मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापालिका सतर्क झाली असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी तयारीला सुरूवात केली आहे. दरम्यान हा वाढता कोरोना लक्षात घेता मुंबई तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता घेऊन मुंबई महापालिकेने आणखी ५ कोरोना केंद्र कार्यान्वित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या ५ कोरोना केंद्रासाठी वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या खासगी कंत्राटदाराकडून भाडे तत्त्वावर व्यवस्थापन सेवा घेण्यात येणार आहे. केंद्रे चालवण्यासाठी महापालिका वैद्यकीय संस्थेला तब्बल १०५ कोटी रुपये मोजणार आहे.

सध्या वरळी, नेस्को, बीकेसी, भायखळा, मुलुंड ही ५ केंद्र सुरू असून येत्या काही दिवसात बीकेसी, दहिसर, मालाड, कांजूरमार्ग व सोमय्या मैदान ही उर्वरित ५ केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

पुढील ३ महिन्यांसाठी अथवा करोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत हे कंत्राट खासगी वैद्यकीय संस्थेला देण्यात येणार आहे. त्यामुळे करोनाचा कालावधी वाढल्यास पालिकेला आणखी कोट्यवधी रुपये वैद्यकीय सेवेपोटी द्यावे लागणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

या केंद्रांतून मुंबईकरांसाठी ७४८ आयसीयू, २०९९ ऑक्सिजन, ८०१ सर्वसाधारण, १०० पेडियाट्रिक आयसीयू, २० डायलिसिस (आयसीयू) खाटा, ४० ट्राएज (आयसीयू) आणि १०० पेडियाट्रिक खाटा उपलब्ध होणार आहेत. पालिका एका आयसीयू खाटेसाठी प्रतिदिन सहा हजार रुपये, ऑक्सिजने खाटेसाठी १ हजार ५०० रुपये तर विना ऑक्सिजन खाटेसाठी ८०० रुपये मोजणार आहे.

५ कोरोना केंद्र

बीकेसी केंद्र : ओम साई आरोग्य केअर प्रा. लि.

३४ कोटी ५१ लाख रुपये

दहिसर केंद्र : लाइफलाईन रुग्णालय मॅनेजमेंट सर्व्हिसेस

१४ कोटी ०५ लाख रुपये

सोमय्या केंद्र : अपेक्स रुग्णालय मुलुंड

५ कोटी ६३ लाख रुपये

कांजूरमार्ग केंद्र : मेडटायटन्स मॅनेजमेंट

२८ कोटी २३ लाख रुपये

मालाड केंद्र : रुबी अॅलकेअर सर्व्हिसेस

२२ कोटी ४७ लाख रुपये

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा