Advertisement

कोरोनाने विक्रोळीत माजी नगरसेविकेचा मृत्यू

कोरोनाची लागण झालेल्या विक्रोळीतील माजी नगरसेविकेचा मंगळवारी मृत्यू झाला.

कोरोनाने विक्रोळीत माजी नगरसेविकेचा मृत्यू
SHARES

कोरोनाची लागण झालेल्या विक्रोळीतील माजी नगरसेविकेचा मंगळवारी मृत्यू झाला. त्यांना कॅन्सर होता. या आजाराच्या उपचारावेळी त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना विशेष कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

विक्रोळी टागोर नगर येथून त्या दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. गेल्या वर्षभरापासून त्यांच्यावर कॅन्सरचा उपचार सुरु होता. नुकतंच त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असताना मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने विभागात शोककळा पसरली आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत 14 हजारपेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 583 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 2465 रुग्ण कोरोनामुक्त झालेले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.



हेही वाचा -

मुंबईत रात्री 'या' वेळेत घराबाहेर पडण्यावर निर्बंध

रेशनचं धान्य घेताना आता ‘अंगठा’ लावण्याची गरज नाही!




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा