मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबीर

 Pratiksha Nagar
मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबीर
मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबीर
मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबीर
See all

शीव - पंचायती गुरुद्वारा आणि के. जी. सोमय्या हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटरच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये इसीजी, नेत्र तपासणी, स्त्रीरोग, रक्त तपासणी आणि रक्तदानसुद्धा होणार आहे. या रिसर्च सेंटरच्या वतीनं मुंबईत आतापर्यंत 70 मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर राबवण्यात आली आहेत. गुरुद्वारामध्ये शिबिराचं मात्र हे पहिलंच वर्ष आहे. रुग्णालयामार्फत राबवल्या जाणाऱ्या या शिबिरांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो, असं के. जी. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अॅन्ड रीसर्चचे प्राध्यापक डॉ. जे. एस. लांबा यांनी सांगितलं. 3 आणि 4 डिसेंबरला सकाळी 10 ते संध्याकाळी 5 दरम्यान हे शिबीर सुरू राहणार आहे.

Loading Comments