SHARE

वरळी - गोदरेजच्यावतीनं आरोग्य जनजागृतीसाठी स्लिप @ 10 या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला गोदरेजचे सीईओ अनिल माथूर आणि २०१० ची कॉमनवेल्थ गोल्ड मेडलिस्ट गीता फोगट उपस्थित होती. वरळी येथील मायफेअर या हॉटेलमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. सध्याच्या धावपळीच्या जगात अनेकांना व्यायाम करण्यास वेळ मिळत नाही. पैसे कमावण्याच्या नादात बरेच लोक आपल्या शरीराकडे लक्ष न देता खूप कष्ट करतात. यामुळे शारिरीक आणि मानसिक थकवा येतो. हेच लक्षात घेऊन अनिल माथूर यांनी स्लिप @ 10 या आरोग्यविषयक जनजागृतीची सुरूवात केली आहे. यावेळी झोप किती महत्त्वाची आहे हे गिता फोगटने उपस्थितांना सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या