Advertisement

'ब्रेन डेड' व्यक्तीमुळे मोनिका मोरेला पुन्हा मिळाले हात

मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानकातील अपघातात दोन्ही हात गमवणाऱ्या मोनिका मोरे या तरूणीला 'ट्रान्सप्लांट' शस्रक्रियेद्वारे पुन्हा एकदा मानवी हात मिळाले आहेत.

'ब्रेन डेड' व्यक्तीमुळे मोनिका मोरेला पुन्हा मिळाले हात
SHARES

मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानकातील अपघातात दोन्ही हात गमवणाऱ्या मोनिका मोरे या तरूणीला 'ट्रान्सप्लांट' शस्रक्रियेद्वारे पुन्हा एकदा मानवी हात मिळाले आहेत. चेन्नईतील एका 'ब्रेन डेड' अवस्थेत पोहोचलेल्या रुग्णाचे हात मोनिकाला लावण्यात आले आहेत. शिवाय उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील एका रुग्णाला देखील त्याचं फुफ्फुस ट्रान्सप्लांट करण्यात आलं आहे. (hand transplant surgery done on mumbai local train accident victim monika more at global hospital)

चेन्नईतील 'ब्रेन डेड' अवस्थेत पोहोचलेल्या रुग्णाचे अवयव दान करण्याचा निर्णय त्याच्या पत्नीने घेतला होता. त्यामुळे या दोघांनाही नवजीवन मिळालं आहे. धावती रेल्वे पकडताना झालेल्या अपघातात मोनिका मोरे हिने २०१४ मध्ये आपले दोन्ही हात कोपरापासून गमावले होते. त्यानंतर मोनिकाला कृत्रिम हात लावण्यात आले होते. हात दान करणाऱ्यांची संख्या फारच कमी असल्यानं मोनिका गेल्या आठ महिन्यांपासून ट्रान्सप्लान्टच्या 'प्लानिंग स्टेज'मध्ये होती. परंतु, आता 'प्रत्यारोपणा'च्या माध्यमातून मोनिकाला पुन्हा एकदा मानवी हात मिळाले आहे. मोनिका 'हात ट्रान्सप्लान्ट' करणारी  मुंबईतील पहिली रुग्ण ठरली आहे.  

हेही वाचा- मोनिका मोरेला पुन्हा मिळणार हात

मुंबईतील ग्लोबल रूग्णालयातील प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘‘अपघातात हात गमावलेल्या मोनिका मोरे हिच्या दोन्ही हातांवर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. चेन्नईच्या ग्लोबल रूग्णालयात ३२ वर्षीय तरूणाला ब्रेनडेड घोषित केल्यानंतर कुटुंबियांच्या परवानगीनुसार त्याचे हात मोनिकाला बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. २७ ऑगस्टला रात्री उशीरा चार्टर्ड विमानाने ते हात मुंबईला आणण्यात आले. रात्री १.४० वाजेपर्यंत हे विमान मुंबईत उतरलं आणि १५ मिनिटात ग्रीन कॉरिडोर करून ते ग्लोबल रूग्णालयात दाखल झालं. त्यानंतर लगेचच तिच्या हातांवर शस्त्रक्रियेला सुरूवात करण्यात आली.’’ 

‘‘ग्लोबल रूग्णालयातील कन्सल्टंट प्लॅस्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉ. नीलेश सातभाई यांच्या नेतृत्वाखाली १२ डॉक्टरांच्या टीमनं मोनिकावर ही शस्त्रक्रिया केली आहे. यात प्लॉस्टिक सर्जन, मायक्रोव्हास्क्युलर आणि पुनर्रचनात्मक सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन आणि भुलतज्ज्ञ यांचा समावेश आहे. या शस्त्रक्रियेनंतर रूग्णाला इटेन्सिव केअर युनिटमध्ये हलविण्यात आले आहे. हात दान करणारी कुटुंब, रूग्णालय, मुंबई व चेन्नई वाहतूक पोलिस आणि अवयवदानासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनचे आम्ही आभार मानू इच्छितो. कारण, वाहतूक पोलिसांच्या सहकार्यामुळे वेळेवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली’’, असंही प्रवक्ताने सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा