Advertisement

मोनिका मोरेला पुन्हा मिळणार हात


मोनिका मोरेला पुन्हा मिळणार हात
SHARES

घाटकोपर रेल्वेस्थानक परिसरात ट्रेनखाली येऊन अपघात झालेल्या मोनिका मोरे हीच्या हाताचं प्रत्यारोपण केले जाणार आहे. त्यामुळे तिला खरेखुरे हात मिळणार आहेत. तिने टीवायची परीक्षा दिल्यानंतर म्हणजेच पुढच्या वर्षी मार्च महिन्यानंतर तिच्या हातांचं प्रत्यारोपण करण्याचा निर्णय मोनिकाच्या कुटुंबियांनी घेतला आहे.


'जो काही खर्च येईल त्याला तयार' 

२൦१४ या वर्षी घाटकोपर स्थानकात ट्रेनखाली येऊन मोनिकाने तिचे दोन्ही हात गमावले होते. या घटनेनंतर, खचून न जाता मोनिका आजही जिद्दीने उभी आहे. ज्यावेळेस तिचा अपघात झाला, तेव्हा ती बारावी इयत्तेत होती. पण, आता ती पंधरावीत शिकत आहे. मार्चमध्ये शेवटची परीक्षा झाली की, तिच्या हातांवर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करायचा विचार असल्याचं तिचे वडील अशोक मोरे यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना सांगितलं.

मोनिकाच्या प्रत्यारोपणासाठी परळच्या ग्लोबल रुग्णालयात विचारणा करण्यात आली आहे. शिवाय, इथल्या डॉक्टरांनीही मोनिकाच्या हातांसाठी जो काही खर्च येईल, त्यासाठी मदत करण्याची तयारी दाखवली असल्याचं तिच्या वडिलांनी मुंबई लाइव्हशी बोलताना सांगितलं आहे.


तिच्या प्रत्यारोपणासाठी जवळपास २२ ते २५ लाख एवढा खर्च येणार आहे. त्यासाठी ग्लोबल हॉस्पिटलनेही मदत करण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे आम्ही अत्यंत खूष आहोत.
- अशोक मोरे, मोनिका मोरे हिचे वडील


२൦१४ मध्ये अपघात झाल्यानंतर मोनिकाला कृत्रिम हात बसवण्यात आले होते. त्यानंतर त्या हातांनी ती तिच्या सर्व गोष्टी करत होती. पण, आता तीच्या कुटुंबियांनी तिची पंधरावीची परिक्षा संपली की प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे.


माझी पंधरावीची परीक्षा संपली की माझ्या हातांचं प्रत्यारोपण केलं जाणार आहे. त्यासाठी आम्ही ग्लोबल हॉस्पिटलमध्ये विचारणा केली आहे. शिवाय, त्यानंतर रेल्वेतही मला जॉब करायची संधी मिळेल. कारण माझ्या पंधरावीनंतरच मला रेल्वेकडून जॉब मिळणार असल्याचं सांगितलं होतं.
- मोनिका मोरे



हेही वाचा - 

‘मुलुंड रेल्वे स्थानकातल्या फलाटाची उंची वाढवणार’




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा