Advertisement

‘मुलुंड रेल्वे स्थानकातल्या फलाटाची उंची वाढवणार’


‘मुलुंड रेल्वे स्थानकातल्या फलाटाची उंची वाढवणार’
SHARES

मुलुंड - वाढते अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी मुलुंड रेल्वे स्थानकातल्या फलाटांची उंची वाढवली जाणार आहे. भाजपा खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते सोमवारी त्याचं भूमिपूजनही झालं. लवकरच फलाट क्रमांक एक आणि चारची उंची वाढवण्याचं काम सुरू होणार असल्याचं खासदार सोमय्या यांनी जाहीर केलं आहे.
घाटकोपर रेल्वे स्थानकात मोनिका मोरे नावाच्या मुलीचा अपघात होऊन तिला दोन्ही हात गमवावे लागले होते. या अपघाताची आठवण करून देत सोमय्या यांनी 2017 अखेरपर्यंत मुंबईतल्या सर्व रेल्वे स्थानकांतील फलाटांची उंची वाढवलेली असेल, असं आश्वासन या वेळी दिलं.
या कामाला सुरुवात तर झाली, आता उर्वरित 142 फलाटांचीही उंची वाढवली जाईल. उशिरा का होईना पण प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याबाबत पावलं उचलली गेली, हे महत्त्वाचं आहे. आता हाती घेतलेलं काम वेळेत पूर्ण व्हावं, अशी अपेक्षा मुलुंडकर व्यक्त करत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा