अंधेरीत आरोग्य शिबिराचे आयोजन

 Andheri
अंधेरीत आरोग्य शिबिराचे आयोजन
अंधेरीत आरोग्य शिबिराचे आयोजन
अंधेरीत आरोग्य शिबिराचे आयोजन
अंधेरीत आरोग्य शिबिराचे आयोजन
अंधेरीत आरोग्य शिबिराचे आयोजन
See all
Andheri, Mumbai  -  

अंधेरी - रिपाइंच्या रोजगार आघाडी प्रकाशवाडी कामाबाग सहकारी गृहनिर्माण संस्था, पंचशील फाऊंडेशन आणि प्रियदर्शनी सामाजिक संस्थेच्यावतीने अंधेरीत सोमवारी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डोळ्यांची तपासणी तसेच रक्त तपासणी करून चष्मा वाटप करण्यात आले. सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत झालेल्या शिबिराचा लाभ 950 हून अधिक नागरिकांनी घेतला. रोजगार आघाडीचे महाराष्ट्र सरचिटणीस नवीन रा. लादे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरात माऊली चष्मा घरचे ओटीपी राजेश चव्हाण यांनी नेत्र तपासणी, जीवन पॅथॉलॉजीचे विद्याधर आमोणकर यांनी रक्त तपासणी आणि अमेर केअर्स इंडिया फाऊंडेशनचे डॉ. संजीव कौशिक आणि ग्रुप यांनी उपचार आणि औषधाचे वाटप केले.

Loading Comments