Advertisement

पालिकेच्या एस वॉर्डमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद

बहुतेक प्रकरणं एस वॉर्डातील उच्चस्तरीय सोसायट्यांमधून नोंदवली गेली आहेत.

पालिकेच्या एस वॉर्डमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद
(File Image)
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) उघड केलेल्या ताज्या अहवालानुसार, बहुतेक प्रकरणं एस वॉर्डातील उच्चस्तरीय सोसायट्यांमधून नोंदवली गेली आहेत.

पवई, भांडुप आणि कांजूरमार्ग सारख्या क्षेत्रांचा समावेश असलेल्या एस वॉर्डमध्ये गेल्या आठवड्यात तब्बल 148 कोविड-19 पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली.

आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी पुढे सांगितले की, यापैकी जवळपास 60 टक्के प्रकरणे हिरानंदानी आणि आयआयटी बॉम्बे क्षेत्रातील 12 सोसायट्यांमधून नोंदवली गेली आहेत. तथापि, सध्या, आयआयटी बॉम्बेमध्ये 10 सक्रिय प्रकरणे आहेत.

पवईतील गृहनिर्माण संस्थांमध्ये ब्रेंटवुड, एव्हलॉन, राज ग्रॅन्डर, जलतरंग, एविटा, गोल्डन ओक, टोरिनो हिरानंदानी साउथ अव्हेन्यू, पवई कॉस्मोपॉलिटन, हिरानंदानी झेन मॅपल, ट्रिनिटी, स्कायलाइन व्हिला, महाडा आणि शिवनेरी (आयआयटी बॉम्बे) यांचा समावेश आहे.

दरम्यान, एस वॉर्डच्या अधिकाऱ्याने नमूद केले की, पवई परिसरात नोंदवलेल्या सर्व रुग्णांचा प्रवासाचा इतिहास आहे आणि त्यापैकी बहुतेकांनी लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत. तथापि, सर्व रुग्ण लक्षणे नसलेले आहेत आणि ते होम क्वारंटाईनमध्ये आहेत.

प्रशासकिय संस्था सर्व रूग्णांवर लक्ष ठेवत आहे आणि त्यांच्यापैकी कोणाला लक्षणे दिसत असल्यास आम्ही त्यांना कोविड रूग्णालयात दाखल करत आहोत.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी स्थानिक वॉर्ड ऑफिसला या प्रकरणांमध्ये उच्च-जोखीम असलेल्या संपर्कांचा मागोवा घेण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय, त्यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवले आहे, त्यानंतर त्यांनी स्थानिक वॉर्ड ऑफिसरला एस वॉर्डमध्ये नोंदवलेल्या सर्व उच्च आणि कमी-जोखीम प्रकरणांचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत.

याव्यतिरिक्त, सोसायट्यांना पत्रे जारी केली आहेत ज्यात त्यांना प्रकरणांची माहिती दिली आहे आणि त्यांना COVID नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच सोसायटीमध्ये नवीन प्रकरणे आढळल्यास त्यांना कळवण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांचा आलेख वाढता पाहायला मिळत आहे. पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी मुंबईत 1242 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मंगळवारी 74 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मंगळवारी 506 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 506 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा

covid-19"="" target="_blank">COVID-19 चौथी लाट, १ टक्के रुग्णांमध्येच कोरोनाची तीव्रता अधिक">COVID-19 चौथी लाट, १ टक्के रुग्णांमध्येच कोरोनाची तीव्रता अधिक

लवकरच मास्क घालणे अनिवार्य करणार: आदित्य ठाकरे

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा