Advertisement

COVID-19 चौथी लाट, १ टक्के रुग्णांमध्येच कोरोनाची तीव्रता अधिक

दरम्यान, बैठकीपूर्वी राजेश टोपे यांनी त्यांच्या सरकारचे मुख्य लक्ष लसीकरणावर असल्याचे नमूद केले होते. बूस्टर डोसकडे दुर्लक्ष केले जाऊ नये.

COVID-19 चौथी लाट, १ टक्के रुग्णांमध्येच कोरोनाची तीव्रता अधिक
(File Image)
SHARES

गेल्या आठवड्यापासून कोरोनाव्हायरसच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. महाराष्ट्र सरकारने सोमवारी, 6 जून रोजी उच्चस्तरीय मंत्रिमंडळ बैठक घेतली.

कोरोनाचा आकडा जरी वाढत असला तरी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचं प्रमाण फार कमी आहे. यासंदर्भातीलच आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कोविड टास्क फोर्सची बैठक झाली आणि त्यांनी सद्यस्थितीचा आढावा घेतला आणि राज्याच्या तयारीबाबत चर्चा केली.

बैठकीनंतर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसह 6 जिल्ह्यांमध्ये कोविड-19 पॉझिटिव्ह दर वाढत आहे.

याशिवाय, टोपे यांनी राज्य मंत्रिमंडळाला परिस्थितीचे तपशीलवार विश्लेषण सादर केले. गेल्या सात दिवसांत, राज्यात नोंदलेल्या एकूण प्रकरणांपैकी मुंबईचा वाटा 67.28 टक्के आहे, त्यानंतर ठाणे (17.17%), पुणे (7.42%), रायगड (3.36%) आणि पालघर (2%), सादरीकरणात दिसून आले.

"आम्ही या जिल्ह्यांमध्ये चाचण्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही लोकांना लसीकरण करण्याचे आवाहन करतो. तसंच बुस्टर डोस घेण्याचे देखील आवाहन करतो."

दरम्यान, बैठकीपूर्वी राजेश टोपे यांनी त्यांच्या सरकारचे मुख्य लक्ष लसीकरणावर असल्याचे नमूद केले होते. बूस्टर डोसकडे दुर्लक्ष केले जाऊ नये.

मास्क वापरणे अनिवार्य करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला नाही, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. आपल्या मागील विधानाचा पुनरुच्चार करताना ते पुढे म्हणाले की, “राज्य मंत्रिमंडळाने लोकांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे जरी ते अद्याप अनिवार्य केले गेले नाही. मास्क न घातल्याबद्दल कोणताही दंड आकारला जाणार नाही परंतु लोकांना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क वापरण्याचे आवाहन केले जाईल.”

“आकडेवारीनुसार, राज्यातील केवळ 1% पॉझिटिव्ह केसेस रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे, तीव्रता कमी आहे आणि म्हणूनच चिंतेचे कारण नाही,” टोपे यांनी नमूद केले.

मुंबईत सोमवारी (राज्यातील 1,036 नवीन प्रकरणांपैकी) 676 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. शहरात मागील दिवसाच्या दैनंदिन केस लोडमध्ये किंचित घट झाली आहे ज्यामध्ये जवळपास 1 हजार रुग्ण नोंदवली गेली आहेत.

महाराष्ट्रात 1,036 नवीन प्रकरणे नोंदली गेली आणि सक्रिय प्रकरणांची संख्या 7,429 झाली. याशिवाय, शून्य कोविड मृत्यूची नोंद झाली आहे.हेही वाचा

चिंताजनक! 7 दिवसांत 130 टक्के रुग्णांची वाढ, मुंबईसह 5 जिल्हे हॉटस्पॉट

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा