Advertisement

चिंताजनक! 7 दिवसांत 130 टक्के रुग्णांची वाढ, मुंबईसह 5 जिल्हे हॉटस्पॉट

मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, पुणे हे 5 जिल्हे नवे हॉटस्पॉट ठरत आहे.

चिंताजनक! 7 दिवसांत 130 टक्के रुग्णांची वाढ, मुंबईसह 5 जिल्हे हॉटस्पॉट
SHARES

दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या (maharashtra corona cases) वाढतच चालली आहे. राज्यातील 5 जिल्ह्यात गेल्या 7 दिवसांत तब्बल 130 टक्के रूग्णाची वाढ झाली आहे. मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, पुणे हे 5 जिल्हे नवे हॉटस्पॉट ठरत आहे.

4.31 % लक्षणे असलेले रुग्णांना रुग्णालयांत भरती करण्यात आले आहे. 95 % रुग्णांना लक्षणे नाहीत तर 1.04% रुग्ण गंभीर आहेत.

मुंबईत सिने कलाकारांपासून ते राजकीय नेते कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. मागील सात दिवसांमध्ये राज्यात तब्बल 130 टक्के रूग्णाची वाढ झाली आहे. मुंबईत १३५ टक्के रूग्ण वाढ, पालघर ३५०, ठाणे १९१ टक्के, पुणे ५० टक्के आणि रायगडमध्ये १३० टक्के वाढ झाली आहे.

मुंबई

३० मे ते ५ जून-- ४,८८०रुग्ण

२३ मे ते २९ मे-- २०७० रुग्ण

१३५.७५% वाढ

ठाणे

३० मे ते ५ जून--१,२४५ रुग्ण

२३ मे ते २९ मे--४२७ रुग्ण

१९१.५७% वाढ

पुणे

३० मे ते ५ जून-- ५३८ रुग्ण

२३ मे ते २९ मे-- ३५७

५०.७०% वाढ

रायगड

३० मे ते ५ जून-- २४४ रुग्ण

२३ मे ते २९ मे--१०६ रुग्ण

१३०.१९% वाढ

पालघर

३० मे ते ५ जून--१४४ नवे रुग्ण

२३ मे ते २९ मे-- ३२ नवे रुग्ण

३५०.००% वाढ

तर 4 जूनपर्यंत राज्यात एकूण सक्रीय रुग्णांची ५,८८८ वर पोहोचली आहे. रुग्णालयात भरती असलेले रुग्ण एकूण २५४ आहेत. तर लक्षणविरहित सौम्य लक्षणे असलेले रुग्ण संख्या ५,६३४ वर पोहोचली आहे. 61 गंभीर रुग्ण आहे. तर 46 जण आयसीयूमध्ये दाखल आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तर राज्यात तुर्तास मास्क सक्तीचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. फक्त गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे हे गरजेचं आहे, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

आज राज्यात 1036 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 374 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज 676 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज कोरोनाच्या शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.



हेही वाचा

मास्क बंधनकारक नाही, तर... - राजेश टोपे

कोरोना रुग्णांचा वाढता आकडा, पालिकेच्या नव्या गाईडलाईन्स

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा