Advertisement

भारतात 'या' किंमतीत मिळणार कोरोना लस

भारतात व्हॅक्सीनचे प्रोडक्शन करणाऱ्या सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (SII)ची कोरोना लस 'या' किंमतीत उपलब्ध होणार.

भारतात 'या' किंमतीत मिळणार कोरोना लस
SHARES

भारतात व्हॅक्सीनचे प्रोडक्शन करणाऱ्या सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) कोरोना लस २२२ रुपयात सरकारला देईल. पण एखाद्या व्यक्तीला वयक्तितरित्या ही लस हवी असल्यास त्याला एक हजार रुपये मोजावे लागतील.

SII चे CEO अदार पूनावाला म्हणाले की, वैयक्तिकरीत्या कोणाला लस हवी असल्यास १ हजार रुपये द्यावे लागतील. पण, सरकारला ही लस फक्त २२२ रुपयात मिळेल. जानेवारी २०२१ पर्यंत १० कोटी आणि मार्चपर्यंत ४० कोटी लस तयार केल्या जातील. तसंच, २०२१ च्या अखेरपर्यंत ३०० कोटी लस तयार करण्याचं लक्ष्य आहे. व्हॅक्सीन तयार झाल्यावर सर्वात आधी भारतात डिलिव्हर होईल, त्यानंतर इतर देशात पाठवल्या जातील.

SII च्या व्हॅक्सीनला २ ते ८ डिग्रीपर्यंतच्या तापमानात स्टोअर करता येतं. त्यामुळे ही व्हॅक्सीन जगभर पोहचवणं सोपं जाईल. यापूर्वीच, फायजर, मॉडर्ना आणि रशियाच्या स्पूतनिक-V ने ९०% इफेक्टिव असल्याचा दावा केला आहे. पण, समस्या ही आहे की, फायजरच्या व्हॅक्सीनला -७० डिग्री सेल्सियसवर स्टोरेज करावं लागतं. त्यामुळे यासाठी सध्याच्या कोल्ड चेन आणि रेफ्रिजरेशन सुविधेला अपग्रेड करावं लागेल.

रशियाने दावा केला आहे की, त्यांची व्हॅक्सीन स्पूतनिक-V अमेरिकेच्या फायजर आणि मॉडर्नाच्या व्हॅक्सीनपेक्षा स्वस्त असेल. परंतू, अद्याप रशियाने या व्हॅक्सीनची माहिती सार्वजनिक केली नाही. दोन डोजची किंमत २ हजार ९००  रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. तर, मॉडर्नाच्या व्हॅक्सीनचे दोन डोज ३ हजार ७०० ते ५ हजार ४००  रुपयांपर्यंत असू शकतात.हेही वाचा

मुंबई महापालिकेची ‘सॅप’ प्रणाली गुरुवारपर्यंत बंद

भारतात तयार होणारी कोविड लस ९० टक्के परिणामकारक, 'या' दिवशी देणार पहिली लस

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement