Advertisement

भारतात तयार होणारी कोविड लस ९० टक्के परिणामकारक, 'या' दिवशी देणार पहिली लस

११ डिसेंबरपासून व्हॅक्सीनेशनला सुरुवात होणार आहे. ब्रिटेन, जर्मनीमध्येही डिसेंबरपासून अधिकृतरित्या लसीकरणाला सुरुवात होईल.

भारतात तयार होणारी कोविड लस ९० टक्के परिणामकारक, 'या' दिवशी देणार पहिली लस
SHARES

अमेरिकेत येत्या ११ डिसेंबरपासून व्हॅक्सीनेशनला सुरुवात होणार आहे. ब्रिटेन, जर्मनीमध्येही डिसेंबरपासून अधिकृतरित्या लसीकरणाला सुरुवात होईल. दरम्यान, चाचणांमध्ये ऑक्सफोर्ड/एस्ट्राजेनेका व्हॅक्सीन (कोवीशील्ड) ९०% पर्यंत परिणामकारक आहे.

भारताचे आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी इंडिया टुडेला सांगितलं की, भारतात कोरोना व्हॅक्सीन २०२१ च्या सुरुवातीच्या तीन महिन्यांच्या आत मिळेल. सप्टेंबर २०२१ पर्यंत २५-३० कोटी भारतीयांना लस दिली जाईल. यात सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होईल.

ऑक्सफोर्ड/एस्ट्राजेनेकानं सांगितलं की, यूके आणि ब्राझीलमध्ये केलेल्या परिक्षणांमध्ये व्हॅक्सीन (AZD1222) बऱ्यापैकी परिणामकारक आढळून आली आहे. अर्धा डोज दिल्यावर व्हॅक्सीन ९०% पर्यंत परिणामकारक आढळली. यानंतर दुसऱ्या महिन्यात पूर्ण डोज दिल्यानंतर ६२% परिणामकारक दिसली. याच्या दोन महिन्यानंतर दोन डोज दिल्यावर व्हॅक्सीनचा ७०% चांगला परिणाम जाणवला. ही लस पुण्यातील सीरम इंस्टीट्युट ऑफ इंडिया तयार करत आहे.

संक्रमण आणि मृत्यूच्या बाबतीत अमेरिका सर्वात पुढे आहे. यूएस कोविड-19 व्हॅक्सीन टास्कचे हेड मोन्सेफ सलोईनं CNN ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, अमेरिकेत येत्या ११ डिसेंबरपासून व्हॅक्सीनेशला सुरुवात होईल. फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA)ने व्हॅक्सीनला मंजूरी दिल्यानंतर आम्ही नागरिकांना लस देण्याचं काम सुरू करणार आहोत.



हेही वाचा

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता; राज्यातील रुग्णांच्या संख्येत वाढ

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ, मागील ५ दिवसांत आढळले ४४६० कोरोनाबाधित रुग्ण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा