Advertisement

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ, मागील ५ दिवसांत आढळले ४४६० कोरोनाबाधित रुग्ण

मुंबईत दिवाळीपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे.

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ, मागील ५ दिवसांत आढळले ४४६० कोरोनाबाधित रुग्ण
SHARES

दिवाळी आणि त्यानंतरचे पुढील १५ दिवस कोरोना विषाणू (coronavirus) संसर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याने प्रशासनाकडून जनतेला सातत्याने सतर्क राहण्याच्या सूचना केल्या जात आहेत. असं असूनही मुंबईत दिवाळीपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे.

दिवाळी आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या थंडीमुळे कोरोना संसर्गाचा वेगाने फैलाव होऊन कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. दिल्ली आणि अहमदाबादमध्ये या दुसऱ्या लाटेचा प्रत्यय येऊ लागला आहे. दिल्लीमध्ये मागील काही दिवसांमध्ये हजारच्या वर कोरोनाबाधित रुग्ण सापडू लागले आहेत. अशीच लाट मुंबईतही येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने जनता रस्त्यावर उतरली होती. खरेदीसाठी नाक्यानाक्यावर आणि बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी झाली होती. तोंडावर मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन अशा आवश्यक बाबींकडे अनेकांनी कानाडोळा केला. अजूनही बहुतांश जनता बेफिकीर असल्यासारखी वागत असल्याने वाढत्या थंडीसोबत कोरोनाचा फैलाव देखील वेगाने होईल, असं म्हटलं जात आहे. 

हेही वाचा- कोरोनाची दुसरी लाट महागात पडेल- राजेश टोपे

मुंबईच्याच आकड्यांबाबत बोलायचं झाल्यास १६ तारखेरला भाऊबीज झाल्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी मुंबईत ५४१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर १४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २७०६६० वर गेला आणि एकूण मृत्यूची संख्या १०५९९ एवढी झाली. १८ नोव्हेंबर रोजी मुंबईत ८७१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर १६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २७१५३१ एवढी झाली आणि एकूण मृत्यूचा आकडा १०६१५ वर गेला. १९ नोव्हेंबर रोजी मुंबईत ९२४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर १२ जणांचा मृत्यू झाला. यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या २७२४५५ वर गेली आणि आतापर्यंत एकूण १०६२७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. २० नोव्हेंबर रोजी मुंबईत १०३१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर १२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या २७३४८६ वर गेली, तर एकूण मृत्यू १०६३९ इतके झाले. २१ नोव्हेंबर रोजी मुंबईत १०९३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर १७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे मुंबईत कोरोनाबाधितांची एकूण संख्या २७४५७९ एवढी झाली, तर १०६५६ एवढे मृत्यू झाले.

या आकडेवारीनुसार मुंबईत १७ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या ५ दिवसांमध्ये  ४४६० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. या ५ दिवसांमध्ये (५४१+८७१+९२४+१०३१+१०९३) कोरोनाबाधितांची संख्या वाढतानाच दिसत आहे. याकडे पाहता मुंबईकरांनी अधिक दक्ष राहण्याची गरज आहे, अशी अपेक्षा प्रशासनाकडून केली जात आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा