Advertisement

लक्षणांवरून COVID झालाय की SARI हे कसं ओळखाल?

कोरोनाची आणि सारीची लक्षणं कशी ओळखायची? यात काही साम्य आहे का? या दोन्ही आजारांची लक्षणं कुठली हे जाणून घेऊयात.

लक्षणांवरून COVID झालाय की SARI हे कसं ओळखाल?
SHARES

सध्या कोरोनाव्हायरस जगभरात धुमाकूळ घालत आहे. पण कोरोनासोबतच आणखी एक संकट डोक्यावर आहे. सध्या काही शहरांमध्ये सारी (SARI) या आजारानं ग्रस्त रुग्ण देखील सापडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे.

कोरोना आणि सारी याआजारावरून लोकांमध्ये संभ्रम आहेत. आपल्याला झालेल्या आजाराची लक्षणं कोरोनासारखी आहेत की सारी सारखी यावरून लोकांमध्ये संभ्रम आहे. कोरोनाची आणि सारीची लक्षणं कशी ओळखायची? यात काही साम्य आहे का? या दोन्ही आजारांची लक्षणं कुठली हे जाणून घेऊयात.

SARI म्हणजे काय?

SARI म्हणजेच सिव्हिअर अॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस. SARI आणि कोरोना विषाणुमुळे होणारा कोव्हिड-19 दोन्ही आजार श्वसनसंस्थेशी संबंधित आजार आहेत.

COVID आणि SARI मधील साम्य

  • दोन्ही श्वसनसंस्थेशी निगडित आजार आहेत.
  • दोन्हीमध्ये श्वास घेताना त्रास होतो.
  • दोन्ही आजारांमध्ये रुग्णाला ताप येतो आणि हाय टेम्परेचर असू शकतं.
  • शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं.
  • मधुमेह, उच्च रक्तदाब असे इतर काही आजार असणाऱ्यांच्या मृत्यूचं प्रमाण दोन्हीमध्ये जास्त आहे.

दोन्ही आजारांमधील फरक

कोरोना आणि सारी यामध्ये फरक करणं फारच कठिण आहे. त्यांची लक्षणं सारखी असल्यानं एखाद्याला कोरोना झाला आहे की सारी हे सांगता येऊ शकत नाही. कोरोना हा श्वसनसंस्थेशी निगडीत आजार आहे. त्यामुळे ज्यांना श्वसनासंबंधी आजार आहे, त्यांची कोरोना चाचणी घेणं गरजेचं असतं. तेव्हाच कोरोना झाला आहे की सारी हे सांगता येऊ शकते.हेही वाचा

कोरोनाविरोधात लढा देण्यास घरगुती उपाय किती प्रभावशाली?

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा