Advertisement

केईएम रुग्णालयात मांजरीने खल्ले मानवी भ्रूण

बायोमेडिकल वेस्टरुम मध्ये रुग्णांच्या शरीराचे कापलेले अवयव हे पिशव्यांमध्ये ठेवलेले होते. पिशवीतील हे भ्रूण मांजरीने खल्ल्याने एकच खळबळ उडाली आहे.

केईएम रुग्णालयात मांजरीने खल्ले मानवी भ्रूण
SHARES

मुंबईत परळ येथील केईएम रुग्णालयात प्रशासनाच्या गलथानप्रकारामुळे अडिच वर्षाच्या प्रिन्सला आपला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असताना. मंगळवारी रुग्णालय परिसरात एक मांजर मानवी भ्रूण खाताना दिसली आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या विश्वासहर्तेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

केईएम रुग्णालयाच्या बायोमेडिकल वेस्टरुम मध्ये रुग्णांच्या शरीराचे कापलेले अवयव हे पिशव्यांमध्ये पॅक करून ठेवले जातात. त्याच खोलीत एक-दोन महिन्यांचे भ्रूण ठेवले होते. त्यावेळी एका मांजरीने ते भ्रूण असलेली पिशवी कपाटाखाली पळवून नेत भ्रूण खाण्यात सुरूवात केली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मांजरीला भ्रूण खाताना पाहून आरडाओरडा केली. ही घटना वरिष्ठांच्या कानी पडल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत मांजरीने भ्रूणचा बहुतांश भाग खल्ला होता. डाँक्टरांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

पालिकेच्या एफ/दक्षिण विभागातील एका कंत्राटदाराला बायोमेडिकल वेस्टरुममधील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे कत्राट दिले आहे. बायोमेडिकल वेस्टरुममधील कचरा भरलेल्या वाहनामधून मानवी भ्रूण खाली पडल्यानंतर मांजरीने ते उचलले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  केईएम रुग्णालयाच्या बायोमेडिकल वेस्टरुम परिसरात मोठ्या प्रमाणात रॅबिट पडलेले आहे. त्यातच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रुग्णालय परिसरात स्वच्छतेसाठी रुग्णालय प्रशासनाकडून पाहणी सुरू केली आहे.

Read this story in English
संबंधित विषय