Advertisement

हवं होतं इच्छामरण, डॉक्टरांनी दिलं जीवदान!

मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त संपदा यांनी जगण्याचीच उमेद सोडून दिली होती. त्या कुटुंबीयांना वारंवार शासकीय यंत्रणेकडे इच्छामरणासाठी अर्ज करण्याची विनवणी करत होत्या. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी शेवटचा उपाय म्हणून संपदा यांना मुलुंडच्या 'यूएसएसएच' रुग्णालयात दाखल केलं. तिथं दाखल होताच डाॅक्टरांनी केलेल्या योग्य उपचारांच्या आधारे त्यांची केवळ तब्येत सुधारली नाही, तर त्यांना जगण्याची नवी उमेदही मिळाली.

हवं होतं इच्छामरण, डॉक्टरांनी दिलं जीवदान!
SHARES

एकदा एखादा आजार शरीराला जडला की त्या रुग्णाची जगण्याची इच्छाशक्ती संपते. असाच काहीसा प्रकार भांडुपच्या संपदा पारकर (३७) यांच्यासोबत घडला. मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त संपदा यांनी जगण्याचीच उमेद सोडून दिली होती. त्या कुटुंबीयांना वारंवार शासकीय यंत्रणेकडे इच्छामरणासाठी अर्ज करण्याची विनवणी करत होत्या. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी शेवटचा उपाय म्हणून संपदा यांना मुलुंडच्या 'यूएसएसएच' रुग्णालयात दाखल केलं. तिथं दाखल होताच डाॅक्टरांनी केलेल्या योग्य उपचारांच्या आधारे त्यांची केवळ तब्येत सुधारली नाही, तर त्यांना जगण्याची नवी उमेदही मिळाली.


अशी खालावली स्थिती

संपदा यांचं वजन वाढलं होतं. त्यातच २००५ साली खासगी रुग्णालयातील डाॅक्टरांनी त्यांना डायबिटीज असल्याचं निदान केलं. त्यानंतर त्यांना कसलाही त्रास जाणवला नाही. पण अचानक २०१० साली पारकर यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. चाचणीत त्यांना मूत्रपिंडाचा आजार असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर दोन वर्षे उपचार करूनही त्यांची तब्येत खालावली. वेदना, उलट्या आणि अन्नावरची उडालेली वासना यामुळे त्या अशक्तही झाल्या.


योग्य उपचार झालेच नाही

मागील ६ वर्षांपासून त्यांना खाण्याची इच्छाच होत नव्हती. दुसऱ्या खासगी रुग्णालयात उपचार घेऊनही त्यांना फरक पडत नव्हता. त्यांना नेमकं काय होतंय? याचं निदान काही केल्या होत नव्हतं. अखेर त्यांच्या कुटुंबीयांनी संपदा यांना फेब्रुवारी २०१७ मध्ये यूएसएसएच रुग्णालयात दाखल केलं. तिथं त्यांच्या अनेक तपासण्या करण्यात आल्या. तेव्हा लक्षात आलं की, संपदा यांच्यावर योग्य उपचार न झाल्यामुळे त्यांची परिस्थिती फारच गंभीर बनली आहे.


अन् त्या स्वत:च उभ्या राहिल्या

त्यानंतर तब्येत सुधारण्यासाठी त्यांना आठवड्यातून तीन वेळा हिमोडायलेसिस करावं लागेल, असा सल्ला आम्ही दिला. सुयोग्य आणि पुरेशा प्रमाणात फिजिओथेरपी आणि आहारतज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं. त्यानंतर, पुढच्या १५ दिवसांत त्यांच्या पायांमध्ये हालचाल झाल्याचं निदर्शनास आलं. त्यांच्या स्नायूंमधली ताकद वाढली आणि आधार घेऊन त्या स्वत: उभ्या राहू लागल्या, असं यूएसएसएच रुग्णालयातील न्यूरोलॉजीस्ट डॉ. धनश्री चोणकर यांनी सांगितलं.


माझ्या आधीच्या रुग्णालयातील तीव्र औषधांमुळे, अयोग्य उपचार आणि चुकीच्या आहारसवयींमुळे वजन खूप वाढलं आणि शरीरातल्या द्रव्याच्या प्रमाणावरही विपरीत परिणाम झाला. पण, आता मी स्वत:च्या पायावर नीट चालू शकते.

- संपदा पारकर, रुग्ण


संपदा यांची तब्येत केवळ डायलेसिस, फिजिओथेरपी आणि वेळोवेळी योग्य उपचार घेतल्यामुळेही सुधारणार होती. काही महिन्यांपूर्वी संपूर्णत: अंथरुणावर खिळलेल्या संपदा आता मात्र दैनंदिन दिनचर्या स्वतंत्रपणे करू शकतात.

- डॉ. वैभव केसकर, मूत्रपिंडविकारतज्ज्ञ, यूएसएसएच रुग्णालय

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा