Advertisement

कोरड्या डोळ्यांसाठी 'एम २२ ऑप्टिमल पल्स टेक्नोलॉजी'


कोरड्या डोळ्यांसाठी 'एम २२ ऑप्टिमल पल्स टेक्नोलॉजी'
SHARES

सर्व वयोगटातील रुग्णांना कोरड्या डोळ्यांचा त्रास सतत जाणवत राहतो. हीच समस्या दूर करण्यासाठी मुंबईतील कांदिवली आणि वांद्र्याच्या ओजस आय हॉस्पिटलने कोरड्या डोळ्यांवरील उपचारांसाठी 'ल्युमेनिस एम २२ ऑप्टिमल पल्स टेक्नोलॉजी (ओपीटी)' आणली आहे.

प्रामुख्याने कोरड्या डोळ्यांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑफ्थॅल्मिक या नव्या तंत्रज्ञानामुळे लक्षणीय बदल होणार असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

'ल्युमेनिस' या कंपनीने ओपीटी हे सर्वात प्रगत आयपीएल तंत्रज्ञान तयार केलं असून डोळ्यांच्या सुजेवर केल्या जाणाऱ्या उपचारांसाठी 'एम २२ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. फिजिशिअन आणि रुग्ण यांच्यासाठी सोयीच्या दृष्टीने एम२२ सेवा ओजस आय हॉस्पिटलने दिली आहे.

या विषयी बोलताना, ओजस आय हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. नितीन देढीया म्हणाले, 'एम २२ हे नवे तंत्रज्ञान आहे. सर्व वयोगटातील रुग्णांमध्ये कोरड्या डोळ्यांची समस्या आहे, असं अलीकडच्या काळातील केस स्टडीज आणि संशोधन यातून दिसून आले आहे. एम २२ ओपीटी तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त ठरणार आहे. डोळ्यांतील कोरडेपणावर उपलब्ध असलेला आय ड्रॉप हा एकमेव उपाय करण्याचा सल्ला देण्यात आलेल्या रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. आमच्या रुग्णांसाठी एम २२ ओपीटी उपलब्ध करणे हा पश्चिम भारतातील आणि विशेषतः मुंबईतील लोकांसाठी सर्वोत्तम आय केअर देण्यासाठी प्रयत्न आहे'


हजारो लोकांमध्ये आढळणाऱ्या ड्राय आय या आजारावर उपचार करण्यासाठी या नव्या तंत्रज्ञानामुळे मोठी मदत होणार आहे.
- धर्मेंद्र मिस्त्री, कंट्री हेड, ल्युमेनिस इंडिया


ड्राय आय डिसिज होण्याची प्रमुख कारणं

मेबोमिएन ग्लँड डिसफंक्शन (एमजीडी) हे ड्राय आय डिसिज (डीईडी) होण्याचं एक प्रमुख कारण असून जगभरातील लाखो लोकांना या आजाराने ग्रासलं आहे.

ल्युमेनिसची ऑप्टिमल पल्स टेक्नोलॉजी हा रुग्णांसाठी नवा प्रभावी पर्याय निर्माण झाला आहे आणि त्यामुळे ऑक्युलर सरफेस गुणवत्ता, ग्लँड फंक्शन आणि ड्राय आय लक्षणे यामध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे.


कशापद्धतीने करतात तंत्रज्ञानाचा वापर?

पापण्यांच्या सुजण्यावर उपचार करण्यासाठी ल्युमेनिस एम २२ ओपीटी हे अत्यंत चांगलं आहे. ओपीटी अबनॉर्मल रक्तवाहिन्यांच्या हिमोग्लोबिनमध्ये निवडकपणे शोषले जाते आणि थ्रॉम्बॉलिसिसद्वारे ते नष्ट केलं जातं. त्यामुळे, पापण्यांना सूज येण्यासाठी मुख्य कारण असलेला घटक नाहीसा केला जातो.

मनुष्य एका मिनिटात साधारणतः २२ वेळा पापण्यांची उघडझाप करतात, असं अभ्यासात आढळलं आहे. परंतु, कॉम्प्युटर स्क्रीनकडे पाहत असताना किंवा स्मार्टफोन वारत असताना किंवा गाडी चालवत असताना हे प्रमाण कमी होते आणि पापण्यांची उघडझाप मिनिटाला केवळ पाच किंवा सात वेळाच होते. टिअर फिल्म जर डोळ्यात सर्वत्र पसरली नाही तर डोळे शुष्क होतात आणि चुरचुरतात. कोरड्या डोळ्यांचा त्रास लाखो प्रौढांना होतो, असं तज्ज्ञांचं म्हणणे आहे. वाढत्या वयानुसार हा त्रास वाढत जातो.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा