Advertisement

सुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास महाराष्ट्रात बंदी

सुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास बंदी घालणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

सुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास महाराष्ट्रात बंदी
SHARES

महाराष्ट्रातील कुठल्याही पान-बिडी दुकानात किंवा इतरत्र कुठेही सुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास बंदी असेल. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागानं तसा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाची तातडीनं आणि कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस आणि महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत. सुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास बंदी घालणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

सिगारेट किंवा बिडी खरेदी करणाऱ्यांना पाकिटावरील आरोग्याच्या दृष्टीनं देण्यात येणाऱ्या सूचनांचं ग्राफिक आणि इशारा दिसावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच पर्यायानं सिगारेट किंवा तत्सम तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रसार आणि सेवनावर नियंत्रण आणण्याचा उद्देश या निर्णयामागे आहे.

सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा, २००३ अंतर्गत सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना पाकिटाच्या ८५ टक्के भागावर सिगारेट किंवा बिडी आरोग्याला घातक असल्याचा इशारा देणारा संदेश छापणं बंधनकारक आहे. मात्र, सिगारेट किंवा बिडीची सुट्या पद्धतीने विक्री झाल्यास या संदेशाचा उद्देश साध्य होत नाही. सिगारेट किंवा बिडी पिणाऱ्यास धोक्याची कल्पना मिळत नाही, असं कायदा सांगतो.

यापुढे कुणी दुकानदार सुटी सिगारेट किंवा बिडी विक्री करताना सापडल्यास एक वर्षांपर्यंत कारावास किंवा एक हजारापर्यंत दंड आकारला जाईल किंवा या दोन्ही शिक्षा एकत्र दिल्या जातील. पुन्हा तीच व्यक्ती हा गुन्हा करताना आढळल्यास दोन वर्षांच्या शिक्षा किंवा तीन हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल.हेही वाचा

हातांच्या प्रत्यारोपणानंतर मोनिका मोरेला रुग्णालयातून डिस्चार्ज

चुकीच्या पद्धतीनं मास्क घालताय? मग कोरोना होण्याचा धोका अधिक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा