Advertisement

२ वर्षांनंतर 'त्यां'चा परतला आवाज, जसलोक रुग्णालयाची यशस्वी शस्त्रक्रिया


२ वर्षांनंतर 'त्यां'चा परतला आवाज, जसलोक रुग्णालयाची यशस्वी शस्त्रक्रिया
SHARES

आपल्याला जर नीट बोलता येत असेल, तरच मनातील भावना सहज शब्दांत मांडता येतात. पण, एखाद्याला बोलता न येणं हा अनुभवच अंगावर शहारा आणणारा आहे. हाच अनुभव गेल्या २ वर्षांपासून वांद्रे परिसरात राहणारे रुग्ण इरफान खान (बदललेलं नाव) घेत होते. पण, आता त्यांना त्यांचा आवाज परत मिळाला आहे.

मुंबईतील वांद्रे परिसरात राहणारे इरफान खान (६൦) यांना दोन वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यात त्यांनी आपला आवाज गमवला. तेव्हापासून इरफान हे आवाजाविनाच आयुष्य जगत होते.


पुन्हा मिळवला आवाज

अर्धांगवायूने त्रासलेले इरफान खान यांनी त्यावर वेगवेगळे उपचारही केले. पण, त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नव्हती. आपला आवाज गमावल्यामुळे ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचून गेले होते. शेवटी त्यांच्या कुटुंबियांनी जसलोक रुग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. परेश दोशी यांची भेट घेतली आणि त्यांना झालेल्या आजाराबद्दल सांगितलं.


असं कशामुळे होतं?

डीप ब्रेन स्टिम्युलेशन म्हणजेच अशी सर्जरी ज्यामार्फत लकव्यामुळे आवाज गमावणाऱ्या रुग्णांना त्यांचा आवाज परत दिला जाऊ शकतो. याबद्दलची माहिती जसलोक रुग्णायातील डॉक्टरांनी इरफानला देऊन त्यांना ही सर्जरी करून घेण्यासाठी सांगितलं. डीप ब्रेन स्टिम्युलेशन सर्जरीच्या यशस्वी प्रयत्नाने इरफानला गमावलेला आवाज परत मिळाला आहे. इरफान हे 'पार्किन्सन' आजाराने त्रस्त होते. पार्किन्सन हा मज्जासंस्थेचा एक आजार आहे, जो स्वैच्छिक हालचालींना प्रभावित करतो.

डॉक्टरांच्या मते, ही केस दुर्मिळ घटनांपैकी एक आहे. ज्यामध्ये डीपी ब्रेन स्टिम्युलेशन (डीबीएस) सर्जरी पार्किन्सन रोग असलेल्या रुग्णाच्या बोलण्यासाठी प्रभावीरित्या काम करेल. ४ ते ५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून या आजाराने त्रस्त असलेल्यांवर ही सर्जरी केली जाते.


गेल्या २० वर्षांमध्ये, मी ४२५ हून अधिक रुग्णांवर शस्त्रक्रिया केली आहे. पण हे पहिले रुग्ण आहेत, ज्यांचे बोलणे शस्त्रक्रियेनंतर ताबडतोब समजायला लागले. दोन दिवसांच्या शस्त्रक्रियेनंतर आम्हाला हे यश आलं आहे.

डॉ परेश दोशी, न्यूरोसर्जरीचे संचालक, जसलोक रुग्णालय आणि संशोधन केंद्र


यामुळे अनेक रुग्णांना दिलासा

शिवाय, बोस्टन सायंटिफिकच्या नव्या ‘व्हेरसाईस’ या प्रणालीमुळे हृदयात बसवण्यात येणाऱ्या बॅटरीचे आयुर्मान २५ वर्षांनी वाढल्याने अनेक रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

पार्किन्सन या आजारात रुग्णाला डोळ्यांना वस्तू दिसते, मात्र ती वस्तू पकडता येत नाही. कारण डोळ्यांनी मेंदूला जे संदेश दिले जातात, ते नेमकेपणे मेंदूपर्यंत पोहोचत नाहीत. हा संदेश देणाऱ्या असंख्य लहरी तयार होतात आणि रुग्ण गोंधळून जातो. अशा परिस्थितीत डीप ब्रेन स्टिम्युलेशनद्वारे मशीन हृदयात लावण्यात येते.



ही मशिन मेंदूतील योग्य पेशींनाच योग्य संदेश देते. हे छोटे मशिन शस्त्रक्रिया करून हृदयात बसवण्यात येते. त्यामुळे रुग्णाला दैनंदिन आयुष्यातील अनेक लहानसहान अडचणींवर मात करता येते, असंही जसलोक रुग्णालयाचे न्यूरोसर्जरी विभागाचे संचालक डॉ. परेश दोशी यांनी सांगितलं. या नव्या डीबीएस प्रणालीतील बॅटरी दीर्घकाळ टिकते, ही जमेची बाजू आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा