जागतिक महिला दिनानिमित्त चेंबुरमध्ये तपासणी शिबीर

 Vishnu Nagar
जागतिक महिला दिनानिमित्त चेंबुरमध्ये तपासणी शिबीर

चेंबूर (पू) - जागतिक महिला दिनानिमित्त चेंबूर येथील विष्णू नगरमध्ये आरोग्य तपासणी आणि कॅन्सर निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर गुणवत्ता जगन्नाथ कपूर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. सकाळी 10 वाजता सुरु झालेल्या या शिबिराला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. चेंबूर पूर्व येथील विष्णू नगर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात कान-नाक-घसा, संपूर्ण आरोग्य तपासणी, स्तन आणि स्तन कॅन्सर निदान, तपासणी अशा एकूण ५२ जणांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात 5 जणींना कॅन्सर तपासणीमध्ये कॅन्सरची शक्यता दर्शविली गेली आहे. या पाच महिलांची टाटा हॉस्पिटलमध्ये पुढील तपासणी करण्यात येणार आहे.

गेल्या चार वर्षापासून आम्ही कॅन्सर निदान शिबिराचे आयोजन करत आहोत. कॅन्सरबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे हे आमचे महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचं या संस्थेचे ट्रस्टी विनोद कपूर यांनी सांगितले.

Loading Comments