Advertisement

पहिल्या मोबाइल ऑक्सिजन प्लान्ट ‘प्राणवायुदूत’चे उद्घाटन

भारतातील पहिल्या मोबाइल ऑक्सिजन प्लान्ट ‘प्राणवायुदूत’चे उद्घाटन करण्यात आले.

पहिल्या मोबाइल ऑक्सिजन प्लान्ट ‘प्राणवायुदूत’चे उद्घाटन
SHARES

पुण्यातील हायटेक कंपनी ऍक्युरेट गेजिंगच्या एजिमेड विभागाने तयार केलेल्या भारतातील पहिल्या मोबाइल ऑक्सिजन प्लान्ट ‘प्राणवायुदूत’चे आणि हाय फ्लो ऑक्सिजन थेरपी डीवाइस ‘एएफ-100’ व ‘एएफ-60’ या मशिनचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले.

येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हेाते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, ऍक्युरेट गेजिंग एजिमेडचे व्यवस्थापकिय संचालक विक्रम साळुंखे, संचालक संभाजी दिवेकर, रवीशंकर कुलकर्णी, दिलीप काटकर, प्रविण थोरवे, सतिश एम, स्वाती जोशी आदी उपस्थित होते.

हेही वाचा - सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स, निफ्टी वधारले

मोबाइल ऑक्सिजन प्लान्ट हा प्राणवायुदूत 250 एल. पी. एम. (लिटर प्रति मिनिट) क्षमतेचा असून, जिल्हा आरोग्य केंद्रे, ग्रामीण भाग आणि आपत्ती झोनमधील 20 ते 50 बेडच्या हॉस्पिटलची आपत्कालीन गरज पूर्ण करण्यास सक्षम आहे. याची मांडणी करणे अतिशय सोपे असून, हा 30 मिनिटांच्या आत सेवा देण्यास सज्ज होतो. अत्याधुनिक स्थान/जी. पी. एस. ट्रॅकिंग आणि रियल टाइम (आय. ओ. टी.) मॉनिटरिंगमुळे हा सर्वात प्रगत आणि एकमेव मोबाइल ऑक्सिजन प्लान्ट ठरतो.

प्राणवायुदूत हा पूर्ण मोबाइल, ट्रेलर आरोहित (माउंटेड) आणि कंटेनरमध्ये अशा तीन प्रकारात येतो. यामुळे शहर प्रशासनाकडून अग्निशमन दलाच्या सहाय्याने 30 ते 50 किलोमीटरच्या टप्प्यातील रुग्णालयांच्या आपत्कालीन आवश्यकतांची पूर्तता करता येणे सहज शक्य होणार आहे. प्राणवायुदूतमध्ये ऑक्सिजन सिलिंडर भरण्याची सुविधा असून रुग्णवाहिकांमधील ऑक्सिजन सिलिंडर्स भरण्यासाठीही वापरता येतो.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा