जेनेरिक औषधांसाठी सरकार प्रयत्नशील

  Mumbai
  जेनेरिक औषधांसाठी सरकार प्रयत्नशील
  मुंबई  -  

  महाराष्ट्रात जेनेरिक औषधांची केंद्रे जास्तीत जास्त संख्येने सुरू करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अख्यत्यारीतील रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्यावर प्राधान्य राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

  केंद्रीय रस्ते वाहतूक, रसायन आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी याविषयी गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, एकनाथ खडसे आदी उपस्थित होते.

  जेनेरिक औषधे स्वस्त आणि किफायतशीर असल्याने त्याचा फायदा जास्तीत जास्त रुग्णांना व्हावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मांडवीया यांनी सांगितले. येत्या तीन वर्षात प्रत्येक तालुकास्तरापर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.