Advertisement

मुंबईत बायोमेडिकल कचऱ्यात १९, ११७ किलोची वाढ

बायोमेडिकल कचर्‍यामध्ये गेल्या दोन महिन्यांत हळूहळू वाढ होताना दिसून येत आहे.

मुंबईत बायोमेडिकल कचऱ्यात १९, ११७ किलोची वाढ
SHARES

महानगरपालिकेनं (बृहन्मुंबई महानगरपालिका) म्हटलं आहे की, मे महिन्यात सरासरी दैनंदिन बायोमेडिकल कचरा १९ हजार ११७ किलोपर्यंत वाढला आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये अनुक्रमे ११ हजार ३४४ आणि १२ हजार ७४७ किलो कचरा तयार झाला होता. बायोमेडिकल कचर्‍यामध्ये गेल्या दोन महिन्यांत हळूहळू वाढ होताना दिसून येत आहे.

बहुतेक कचरा रुग्णालयांमधून येत आहे. बायोमेडिकल कचर्‍यामध्ये प्रयोगशाळेतील कचरा, हातमोजे, कपडे धुण्याचे सामान, सुई किंवा स्कॅल्पल्स, स्वॅब यासारख्या वस्तूंचा समावेश आहे. शिवाय स्वच्छता आणि सफाई कर्मचार्‍यांकडून वापरल्या जाणार्‍या डिस्पोजेबल पीपीई देखील बायोमेडिकल कचऱ्यामध्ये येतात.

मॉल्सद्वारे दररोज निर्माण होणारा घनकचरा ६ हजार ३०० टनावरून ४ हजार ३०० टनांवर आला आहे. पण सध्या मुंबईतील मॉल्स बंद आहेत. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, क्वारंटाईन सेंटर आणि रुग्णालयांमधील सर्व बायोमेडिकल कचरा कॉम्पॅक्टरमध्ये गोळा केला जातो. काळ्या कचर्‍याच्या पिशवीत असे बायोमेडिकल कचरा गोळा करणं गरजेचं आहे.

हा कचरा देवनार डम्पिंग ग्राऊंडपर्यंत नेला जातो. तिकडे यातला काही कचरा जाळला जातो. तर बिगर-जैव वैद्यकीय कचरा निर्जंतुक केला जातो आणि तो पृथ्वीच्या खाली खोल दफन केला जातो. "हा कचरा गोळा करण्याच्या कामात सहभागी असणाऱ्या कामगारांना, मजदूरांना सुरक्षेसाठी डिस्पोजेबल पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत," अशी माहिती पालिका अधिकाऱ्यानं दिली.




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा