Advertisement

मुंबईतील लसीकरणाला वेग; महापालिका स्वत: पोहोचणार लाभार्थ्यांपर्यंत

कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय मानला जात असून, मुंबईसह संपुर्ण देशभरात लसीकरण केलं जात आहे.

मुंबईतील लसीकरणाला वेग; महापालिका स्वत: पोहोचणार लाभार्थ्यांपर्यंत
SHARES

कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय मानला जात असून, मुंबईसह संपुर्ण देशभरात लसीकरण केलं जात आहे. दरम्यान, महापालिका आणि खासगी अशा एकूण ४७५ व्हॅक्सिनेशन सेंटरवर लसीकरण सुरू असून दिवसाला ८० हजार ते १ लाखापर्यंत डोस देण्यात येत आहेत. यामध्ये १८ वर्षांवरील ९० लाख पात्र लाभार्थ्यांपैकी ९७ टक्के लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला असून, ऑक्टोबरअखेर सर्व मुंबईकरांचा पहिला डोस देऊन पूर्ण होणार आहे. तर ६५ टक्के जणांचे लसीकरण पूर्ण होणार आहे.

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले. यामध्ये महापालिका, राज्य सरकार आणि खासगी केंद्रांवर लाभार्थ्यांना डोस देण्यात येत आहेत. यामध्ये महापालिकेला अनेक वेळा पुरेसे डोस मिळाले नसल्यानं लसीकरणाचा वेग मंदावला असला तरी महापालिकेनं योग्य नियोजनातून लसीकरण पूर्ण करण्याच्या दृष्टीनं वाटचाल सुरू केली आहे. 

लसीकरण पूर्ण करण्यासाठी महापालिका आता शिल्लक लाभार्थ्यांपर्यंत स्वतः पोहोचणार आहे. यासाठी महापालिका सोसायट्या, झोपडपट्ट्यांमध्ये विशेष कोरोना लसीकरण शिबीर आयोजित करणार आहे. १ नोव्हेंबरपासून व्यापक प्रमाणात सुरू होणाऱया उपक्रमात टॅक्सी ड्रायव्हर, फेरीवाले, दुकानदार यांच्यासाठीही विशेष लसीकरण आयोजित करण्यात येईल. यासाठी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून फिरती लसीकरण केंद्रेही सुरू करण्यात येतील.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा