Advertisement

दोन महिलांच्या अवयवदानाने ६ जणांना जीवदान


दोन महिलांच्या अवयवदानाने ६ जणांना जीवदान
SHARES

दिवाळीदरम्यान शहर-उपनगरात दोन कुटुंबीयांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे सहा जणांना जीवनदान मिळाले आहे. या दोन मेंदूमृत (ब्रेनडेड) महिलांमुळे सहा जणांना नवसंजीवनी मिळाल्याने अवयवदानाच्या मोहिमेविषयी सुरू असणारी जनजागृती महत्त्वाची ठरत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

ठाण्याच्या ४६ वर्षीय गीता सोनावणेंना अचानक डोकेदुखी सुरू झाली. त्यामुळे त्यांनी आराम करायचे ठरवले. मात्र, त्याचवेळी झोपेत असताना त्या कोमात गेल्या. यावेळी सोनावणे यांची मुलगी प्रांजल हिने आईचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. गीता सोनावणे यांचे यकृत पुण्यातील ५९ वर्षांच्या रुग्णाला प्रत्यारोपित करण्यात आले. मूत्रपिंड अंधेरी येथील ५१ वर्षीय रुग्णाला प्रत्यारोपित करण्यात आले. दुसरे मूत्रपिंड एका खासगी रुग्णालयाला पाठवण्यात आले.

नवी मुंबईतील ५१ वर्षीय महिला घरात वावरत असताना अचानक कोसळली. त्यानंतर, बेशुद्धावस्थेत तिला महापालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी, डॉक्टरांनी तिच्या मेंदूच्या नसाला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले. शनिवारी तिला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केले. तिचे हृदय मुलुंड येथील ५० वर्षीय रुग्णाला प्रत्यारोपित करण्यात आले.



हेही वाचा - 

दानशूर मुंबईकर...वर्षातलं 34वं अवयवदान नानावटीमध्ये यशस्वी


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा