Advertisement

कोरोनाला आळा घाण्यासाठी मुंबई महापालिकेचा 'Action Plan'

राज्यासह मुंबईत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होत असून, बाधितांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसंच, मृत्यूंचाही आकडा अधिकाअधिक वाढत आहे. याचपार्श्वभूमीवर आता मुंबई महापालिका देखील सज्ज झाली आहे.

कोरोनाला आळा घाण्यासाठी मुंबई महापालिकेचा 'Action Plan'
SHARES

राज्यासह मुंबईत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होत असून, बाधितांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसंच, मृत्यूंचाही आकडा अधिकाअधिक वाढत आहे. याचपार्श्वभूमीवर आता मुंबई महापालिका देखील सज्ज झाली आहे. कोरोनाशी लढण्यासाठी मुंबई महापालिकेनं 'Action Plan' तयार केला आहे. त्यामध्ये येत्या ७ दिवसात १ हजार १०० कोविड सेंटर कार्यान्वित करण्यात येणार आहेत. तसेच मुंबईत कोरोना संकट वाढत असल्यानं मुंबई महापालिका हॉटेल्सचीही मदत घेणार आहेत.

महापालिकेतर्फे हॉटेल्सची नावं जाहीर करण्यात येतील. त्यानुसार, त्या यादीतील हॉटेलमध्ये रुग्ण वास्तव्य करु शकतील. यामुळं ज्या रुग्णांना खरच बेडची आवश्यकता आहे, अशा व्यक्तींना त्याठिकाणी हलवण्यात येण्यास मदत होईल. त्या हॉटेल्समध्ये कोविड सेंटरसारखे प्रशिक्षित डॉक्टर आणि इतर सुविधा असतील, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

सध्या मुंबईत कोरोनाची गंभीर परिस्थिती असल्यामुळं मुंबई महापालिकेनं कठोर पाऊलं उचलली आहेत. याकरता महापालिकेकडून कृती कार्यक्रम तयार केला असून रुग्णांना बेड मिळण्यासाठी महापालिकेनं कठोर कार्यपद्धती अमलात आणली आहे. आता प्रत्येक वार्डासाठी २ नोडल अधिकारी असणार आहेत. हे अधिकारी आता २ शिफ्टमध्ये काम करणार आहेत. 

दुपारी ३ ते रात्री ११ आणि रात्री ११ ते ७ यावेळेत ते काम पाहणार आहेत. त्यामुळे सांयकाळी ७ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत रुग्णांना बेडसाठी वणवण करावी लागणार नाही. तसेच १९१६ वर कॉल केला असता, तो फोन व्यस्त सांगण्यात येतो. त्यामुळे आता प्रत्येक वॉर्डमधील वॉररुममध्येच फोन करावा. जेणेकरुन वॉररुम आणि नोडल अधिकारी बेड मिळवून देण्यासाठी मदत करतील, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

ज्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. अशा व्यक्तींचा अहवाल २४ तासांत द्यावा. यामुळे त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्या व्यक्तीवर तात्काळ औषधोपचार करण्यास मदत होईल. तसेच महापालिकेने ३२५ अतिरिक्त आयसीयू बेड रुग्णालयांना जोडण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण आयसीयू बेड्सची संख्या २ हजार ४६६ वर गेली आहे. तरी नागरिकांना स्वत:ला जपावे. २ दिवस सण आले आहेत. त्यामुळे घरातच नागरिकांनी आनंदाने सण साजरा करावा, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा