Advertisement

गुरुवारपासून गर्भवती महिलांचं लसीकरण, 'या' ३५ रुग्णालयांमध्ये होणार लसीकरण

बृहन्मुंबई मनपा क्षेत्रात विविध ३५ ठिकाणी लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. जाणून घ्या संपूर्ण यादी...

गुरुवारपासून गर्भवती महिलांचं लसीकरण, 'या' ३५ रुग्णालयांमध्ये होणार लसीकरण
SHARES

मुंबई महापालिकेकडून उद्या म्हणजेच १५ जुलैपासून गर्भवती मातांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी बृहन्मुंबई मनपा क्षेत्रात विविध ३५ ठिकाणी लसीकरणाची सोय करण्यात आली आहे.

महत्त्वाचे निर्देश

१) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील संबंधीत लसीकरण केंद्रात गर्भवती महिला गर्भधारणेनंतरच्या पूर्ण कालावधींतर्गत सदर लसीचा लाभ घेऊ शकतात.

२) प्रत्येक गरोदर महिलेनं या संदर्भात संपूर्ण माहिती घ्यावी आणि पूर्ण माहितीपश्चात स्वेच्छेनं (informed choice) लसीकरण करवून घ्यावं.

३) ज्या महिलांना ‘कोविड – 19’ प्रादुर्भाव होऊन गेलेला असेल आणि ज्या महिलांना ‘मोनॉक्लोनल ऑंटीबोडीज’ किंवा ‘convalescent’ प्लाजमा हा उपचार घेतलेला असेल, अशा महिलांना १२ आठवड्यानंतर लसीकरण करून घेता येईल.

४) लसीकरणासंदर्भातील अधिक माहिती करीता सर्व आरोग्‍य केंद्र, प्रसतिगृहे, वैद्यकिय आरोग्‍य अधिकरी -विभाग यांच्‍याशी संपर्क साधावा.

५) लसीकरणापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


'या' रुग्णालयात होणार लसीकरण

  • ए विभाग – कामा रुग्णालय, फोर्ट
  • ई विभाग – बा.य.ल. नायर धर्मार्थ रूग्णालय आणि टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई सेन्ट्रल
  • ई – जगजीवनराम पश्चिम रेल्वे रूग्णालय, भायखळा
  • ई विभाग – जे. जे. रूग्णालय, भायखळा
  • ई विभाग – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्य रेल्वे रूग्णालय, भायखळा
  • एफ उत्तर विभाग – मुंबई पोर्ट ट्रस्ट, वडाळा
  • एफ उत्तर विभाग – लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय, शीव
  • एफ दक्षिण विभाग – राजे एडवर्ड स्मारक रूग्णालय आणि सेठ गो. सुं. वैद्यकीय महाविद्यालय, परळ
  • एफ दक्षिण विभाग – एम. जी. एम. रुग्णालय, परळ
  • एफ दक्षिण विभाग – नायगाव प्रसूतिगृह
  • जी उत्तर विभाग – माहीम सूतिकागृह, माहिम
  • जी दक्षिण विभाग – ई. एस. आय. एस. रुग्णालय, वरळी
  • एच पूर्व विभाग – विष्णूप्रसाद नंदराय देसाई मनपा सर्वसाधारण रूग्णालय, सांताक्रूझ (पूर्व)
  • एच पश्चिम विभाग – के. बी. भाभा रूग्णालय, वांद्रे (पश्चिम)
  • के पश्चिम विभाग – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु. न. कुपर रूग्णालय, जुहू – विलेपार्ले (पश्चिम)
  • के पूर्व विभाग – शिरोडकर प्रसूतिगृह, विलेपार्ले
  • एल विभाग – खान बहादूर भाभा मनपा रुग्णालय, कुर्ला भाभा, कुर्ला (पश्चिम)
  • एल विभाग – माँ साहेब मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह, चुनाभट्टी
  • एम पूर्व विभाग – देवनार प्रसूतिगृह
  • एम पश्चिम विभाग – पं. मदनमोहन मालविय शताब्दी रूग्णालय, गोवंडी (पूर्व)
  • एम पूर्व विभाग – बी. ए. आर. सी. रुग्णालय, चेंबूर
  • एम पूर्व विभाग – आर. सी. एफ. हॉस्पिटल
  • एन विभाग – मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसूतिगृह
  • एन विभाग – संत मुक्ताबाई मनपा सर्वसाधारण रुग्णालय, घाटकोपर (पश्चिम)
  • एन विभाग – सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमीदास व्होरा मनपा सर्वसाधारण रुग्णालय, राजावाडी घाटकोपर (पूर्व)
  • पी उत्तर विभाग – चौक्सी प्रसूतिगृह, मालाड
  • पी उत्तर विभाग – मनोहर वामन देसाई मनपा सर्वसाधारण रूग्णालय, मालाड (पूर्व)
  • पी उत्तर विभाग – रिद्धी गार्डन मनपा दवाखाना
  • आर मध्य विभाग – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मनपा सर्वसाधारण रूग्णालय, बोरीवली
  • आर मध्य विभाग – चारकोप विभाग 3 प्रसूतिगृह
  • आर दक्षिण विभाग – आकुर्ली प्रसूतिगृह, कांदिवली
  • आर दक्षिण विभाग – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मनपा सर्वसाधारण रूग्णालय, कांदिवली (पश्चिम)
  • आर दक्षिण विभाग – इ. एस. आय. एस. रूग्णालय, कांदिवली
  • एस विभाग – एल. बी. एस. प्रसूतिगृह
  • टी विभाग – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मनपा रूग्णालय, मुलुंड (पूर्व)

राज्यात दिनांक १९ मे २०२१ पासून स्तनदा मातांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, आता ‘राष्‍ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्‍लागार गट’ आणि ‘कोविड – 19 ’ लसीकरणासाठी असलेला ‘राष्‍ट्रीय तज्ज्ञ गट’ यांच्‍या शिफारशीनुसार भारत सरकारनं गरोदर महिलांना ‘कोविड – 19’ लसीकरणात समाविष्‍ट केलं आहे. यानुसार गुरुवार दिनांक १५ जुलै २०२१ पासून गरोदर मातांचे लसीकरण सुरु करण्यात येत आहे.



हेही वाचा

सप्टेंबरपासून सीरम बनवणार स्पुतनिक व्ही

रशियातील स्पुटनिक व्ही लस मुंबईत दाखल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा