Advertisement

निवासी डॉक्टरांचा संप मागे, रुग्णांना मोठा दिलासा

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर संप मागे घेण्यात आला आहे.

निवासी डॉक्टरांचा संप मागे, रुग्णांना मोठा दिलासा
SHARES

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला मार्डच्या निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतच्या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर डॉक्टरांनी हा निर्णय घेतला आहे.

गिरीश महाजन यांनी सांगितलं की, मी काही दिवसांपूर्वीच हॉस्टेलला भेट दिली होती. हॉस्टेलमध्ये वाईट अवस्था आहे, हे मी मान्य करतो. मी प्राधान्याने हा विषय हाती घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 12 ते 15 कोटी दिले आहेत. येत्या 2-3 महिन्यात आणखी फंड आणू आणि त्यानंतर काम सुरू होईल.

केंद्र शासनाकडे 500 कोटींची मागणी करत आहे, सीएसआर कंपन्यांकडे देखील हॉस्टेल बांधण्यासाठी मदतीची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांना निवासाची सोय करून दिली जाईल असेही महाजन म्हणाले.

तसेच महापालिकांच्या प्रश्नांबाबत आयुक्तांशी चर्चा केली आहे असेही महाजन म्हणाले. संघटनेसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर त्यांनी संप मागे घतल्याचे देखील ते म्हणाले.

संपकरी डॉक्टरांची प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी होती की, वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या 1432 जागांची पद भरती करावी. यावर गिरीश महाजनांनी आश्वासन दिलं की, वरिष्ठ निवासी डॉक्टरांची 1432 पदे दोन ते तीन दिवसांमध्ये भरली जातील. विद्यार्थ्यांचे इतर प्रश्न देखील सोडवले जातील असं अश्वासनही त्यांनी दिलं आहे.



हेही वाचा

परळच्या केईएम रुग्णालयात सुरू होणार स्किन बँक

मुंबईत कोरोना वाढू नये म्हणून पालिकेच्या 'या' आहेत गाईडलाईन्स

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा